अर्थव्यवस्थेला कोरोनाचा ‘ झटका ‘ ..


  • जागतिक बँकेचा अहवालात व्यक्त केली चिंता..
  • २०२०-२१ मध्ये या विकास दरात घट होऊन तो २.८ टक्के इतका असेल.

मुंबई : करोना व्हायरसचा विळखा संपूर्ण जगावर पडला असून यामुळे अनेक देशांच्या अर्थव्यवस्थेवर परिणाम झाला आहे. या संदर्भात जागतिक बँकेने दिलेल्या अहवालानुसार करोनाचा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसणार आहे. यामुळे देशाचा विकास दर घसरणार असल्याचे म्हटले आहे.

जागतिक बँकेने रविवारी दक्षिण आशियातील अर्थव्यवस्थेवर ताजा अहवाल सादर केला. या अहवालात २०१९-२० मध्ये भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर ५ टक्के इतका राहील असे म्हटले आहे. तर २०२०-२१ मध्ये या विकास दरात घट होऊन तो २.८ टक्के इतका असेल.

करोना व्हायरसचा झटका अशा वेळी बसला आहे. जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था आधीच घसरणीला लागली होती. जागतिक अर्थव्यवस्थेत अनिश्चितता आणि धोका वाढल्याने देशांतर्गत गुंतवणुकीत सुधारणा करावी लागले. वर्ल्ड बँकेच्या अहवालानुसार पुढील आर्थिक वर्ष म्हणजे २०२१-२२ मध्ये करोनाचा प्रभाव संपेल आणि त्यानंतर भारताची अर्थव्यवस्था ५ टक्के विकास दर गाठू शकेल.

करोना व्हायरसच्या प्रभावामुळे देशांतर्गत पुरवठा आणि मागणी यावर परिणाम होईल. ज्यामुळे विकास दर २.८ टक्के इतकाच असेल. देशात लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे अर्थव्यवस्थेवर त्याचा परिणाम पुढील काही दिवस दिसेल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *