अभिनव उपक्रम : मुबंईतील विविध रुग्णालयात कर्मचाऱ्यांसाठी ज्यूस वाटप..!
बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेतर्फे उपक्रम..!

| मुंबई | कोरोनाच्या युद्धात प्राणपणाने लढणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची रोग प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी प्रसिद्ध डांबर कंपनीचे फळांचे रस (ज्यूस बॉटल) वाटप बृहन्मंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेमार्फत करण्यात आले, असे सरचिटणीस अविनाश दौंड यांनी सांगितले आहे.

मुंबईतील सेंट जॉर्ज रुग्णालय, जे जे रुग्णालय, नागपडा पोलीस रुग्णालय, मुंबईतील भायखळा, राजावाडी, कूपर, सिद्धार्थ शवविच्छेदन केंद्र, नायगाव पोलीस रुग्णालय येथे सर्व अधिकारी, कर्मचारी यांना ज्यूसचे वाटप करण्यात आले. वाटपाची संपूर्ण नियोजन पोलीस रुग्णालय कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष गजानन बावदणे, विजय घाडगे, दिलीप कोळंबकर यांनी केले. तसेच जे जे रुग्णालयाच्या श्रीमती कविता ठोंबरे, योगिता साळवी तसेच सेंट जॉर्ज रुग्णालय संघटनेचे संदिप गोसावी, विठोबा, श्रीमती विजया भोपटे, शवविच्छेदन कर्मचारी संघटनेचे पवार तसेच शिवाजी घागरे या सर्वांनी परिचरिका, रुग्णालयात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांपर्यंत हे पोहोचविण्याची जबाबदारी पार पाडली.

दरम्यान, ही सर्व मदत बृहन्मुंबई राज्य कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद सरदेशमुख आणि सामाजिक कार्यकर्ते श्री किशोर मंगल यांच्या मदतीने करण्यात आली. या लॉकडाऊनच्या परिस्थितीत संघटनेने कर्मचाऱ्यांसाठी केलेली ही मदत लाख मोलाची आहे, या शब्दात पोलीस सर्जन डॉ एस एम पाटील यांनी आभार व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *