Interesting Facts : ही आहेत देशातील सरासरी सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाणे..!

| मुंबई | सध्या सर्वत्र पावसाचे दिवस आहेत. मुंबईत देखील मुसळधार पाऊस गेल्या २ दिवसात पडला असून सांगली , कोल्हापूर परिसरात तर मागच्या सारखी पुन्हा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परंतु असे असले तरी मुंबईत पडणाऱ्या पावसाहुन किती तरी अधिकचा पाऊस देशातील इतर ठिकाणी पडत असतो. चला तर मग पाहू देशातील सरासरी सर्वाधिक पाऊस पडणाऱ्या ठिकाणांची यादी..!

दरम्यान मागच्या वर्षी देशातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण असलेल्या चेरापुंजीपेक्षाही जादा पाऊस पडल्याची पाटण तालुक्यातील पाथरपुंज इथे झाली होती. कोयनानगरच्या नैऋेत्येला पाटण तालुक्यात पाथरपुंज हे गाव आहे. भैरवनाथ गडापासून तिकडे जाता येते. हे गाव सातारा, सांगली आणि रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमारेषेवर आहे. विश्ोष म्हणजे गाव सातारा जिल्ह्यात असले तरी गावातील घरे तिन्ही जिल्ह्यांत विभागली गेली आहेत. येथे पडणाºया प्रचंड पावसाचे पाणी मात्र सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्याची सीमारेषा ठरलेल्या वारणा नदीच्या पात्रात जाते. या नदीचा उगमही याच गावच्या पश्चिमेला आहे.

१. मौसिनराम, मेघालय
२. चेरापुंजी, मेघालय
३. अगुंबे , कर्नाटक
४. महाबळेश्वर, महाराष्ट्र
५. पासिघाट, अरुणाचल प्रदेश
६. आंबोली, महाराष्ट्र
७. गंगटोक, सिक्कीम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *