Interesting facts : हे आहेत सर्वाधिक सोन्याचा साठा असलेले पाहिले १० देश..!

| मुंबई | आंतरराष्ट्रीय बाजारात पिवळ्या मौल्यवान धातूने प्रति औन्स २,००० डॉलरचा टप्पा ओलांडल्याने भारतात सोन्याचे दर तोळ्यासाठी ५५ हजार रुपयांच्या पुढे गेले. चांदीतील दर वाढही बुधवारी लक्षणीय ठरली. कमकुवत डॉलर आणि सुरक्षित पर्याय म्हणून सोने, सोनेरूपातील गुंतवणूक पर्यायाकडील ओघ ; मौल्यवान धातूला विक्रमी टप्प्यापुढे घेऊन जात आहे. मात्र तुम्हाला सर्वाधिक सोनं असणारा देश कोणता आहे हे ठाऊक आहे का? सोन्याच्या वाढत्या किंमतीच्या पार्श्वभूमीवरच जगभरातील सर्वाधिक सोनं असणाऱ्या देशांची यादी आपण पाहूयात..!

सेलिब्रेशन असो की गुंतवणूक भारतीय समाजमनाचा पहिला पर्याय असतो, सोनं! पिवळंधम्मक, झळाळतं, बावनकशी सोनं! काळ बदलला, पिढय़ा बदलल्या, जगणं बदललं पण सोन्याला असलेलं महत्त्व कमी झालं नाही. भारतीयांना सोनं खास प्रिय आहे यात वादच नाही. मात्र सर्वाधिक सोनं असणाऱ्या अव्वल दहा देशांच्या यादीमध्ये भारत नवव्या स्थानी आहे हे सांगितल्यावर तुम्हाला आश्चर्य वाटेल. मात्र वर्ल्ड गोल्ड काउन्सिल म्हणजेच जागतिक सोने परिषदेच्या मार्चमधील आकडेवारीनुसार अव्वल दहा देशांच्या यादीमध्ये भारतापेक्षा अधिक सोनं असणारे आठ देश आहेत. चला तर मग पाहुयात कोणत्या देशांचा समावेश आहे या सर्वाधिक सोनं असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये…

१. जगात सर्वाधिक सोनं असणारा देश आहे अमेरिका. अमेरिकेकडे आठ हजार १३३ टन सोनं आहे. म्हणजेच अमेरिकेकडील एकूण सोनं हे जर्मनी, इटली आणि फ्रान्समधील एकूण सोन्याच्या साठ्यापेक्षा किंचित कमी आहे असं दिसतं.

२. सर्वाधिक सोनं असणाऱ्या देशांच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी आहे युरोपमधील सर्वात शक्तीशाली अर्थव्यवस्था असणाऱ्या देशांपैकी एक म्हणजेच जर्मनी. जर्मनीकडे एकूण तीन हजार ३६४ टन सोनं आहे.

३. अव्वल तीनमध्ये तिसऱ्या स्थानी आहे इटली. इटलीकडे एकूण दोन हजार ४५१ टन सोनं आहे.

४. चौथ्या स्थानी फ्रान्स आहे. फ्रान्सकडे रशियापेक्षा १३७ टन अधिक सोनं आहे. फ्रान्सकडील एकूण सोनं आहे दोन हजार ४३६ टन.

५. अव्वल पाचमध्ये रशियाचा समावेश आहे. सर्वाधिक सोनं असणाऱ्या देशांच्या यादीत पाचव्या स्थानी असणाऱ्या रशियाकडे एकूण दोन हजार २९९ टन सोनं आहे.

६. सहाव्या स्थानी आहे भरताचा शेजरी देश म्हणजेच चीन. चीनकडे एक हजार ९४८ टन सोनं आहे.

७. सर्वाधिक सोनं असणाऱ्या देशांच्या या यादीमध्ये सातव्या स्थानी स्वित्झर्लंड आहे. स्वित्झर्लंडकडे एकूण एक हजार ४० टन सोनं आहे.

८. आठव्या स्थानी आशियामधील जपान हा देश आहे. जपानकडे ७६५ टन सोनं आहे.

९. नवव्या स्थानावर भारत असून भारताकडे एकूण ६४१ टन सोनं आहे.

१०. दहाव्या स्थानावर आहे नेदरलॅंड्स. या देशामध्ये एकूण ६१३ टन सोनं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *