अन्वयार्थ : आणि सामाजिक भान जपत शिक्षकांनी आईश्री संस्था उभी केली..!

आज आईश्री संस्था स्थापनेला दोन वर्ष पुर्ण होत आहेत थोडा मागोवा घेतला असता २००९ साली ठाणे जिल्हा परिषद ला प्राथमिक शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यापासून कृष्णा साहेबराव मुरमे ह्यांनी सामाजिक कामांची केलेली सुरवात व काही दिवसांनी संदिप गोपाळ भदाणे प्राथमिक शिक्षक ह्यांची साथ लाभली. तेंव्हापासून सुरु केलेल्या प्रवासाने १३ जुलै २०१८ मध्ये संस्थात्मक रूप घेतले आणि संस्था रूपाने दोन वर्षात उल्लेखनीय कामे केली. ते शिक्षकांपासून सुरु झालेला प्रवास आज सामाजिक भान जपत अनेक शिक्षकांनी सेवाकार्यात झोकून घेतल्याचे पहावयास मिळत आहे. मागील दोन वर्षात संस्थेने जव्हार, पालघर, भोईसर, ठाणे, औरंगाबाद या ठिकाणी विविध सामाजिक कार्य केली, दुष्काळी गावांना पाणी पुरवठा, शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप, वृक्षारोपण, पूरक आहार वाटप, दहावीच्या विद्यार्थ्यांमध्ये संस्काराची रुजवणुक व्हावी म्हणून आदर्श विद्यार्थी पुरस्कार, तरुण बेरोजगार तरुण, तरुणींसाठी किराणा दुकान, पिठाची चक्की, फुल शेती, पार्लर या प्रकारचे छोट्या व्यवसायात मदत या बरोबरच कोरोना सारख्या भीषण महामारीच्या काळात जव्हार तालुक्यात खेडोपाडी जावून १३२५ कुटुंबीयांना अन्नधान्याची किट वाटप करून त्यांचे पालकत्व स्वीकारले.

तसेच जव्हार तालुक्यातील वाढती कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेत १५०० कुटुंबांना आर्सेनिक अल्बम ३० औषधी पोहोचविणे, दुर्गम पाड्यांवर जन- जागृती करून कोरोना संक्रमण थांबविण. गावकऱ्यांसोबत समुपदेशन करणे अशी कामे केली. मात्र या कामापेक्षा संस्थेने स्वतः ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. ती अनाथांचे नाथ म्हणून. तीन अनाथ विद्यार्थ्यांना शैक्षणिक दत्तक घेवून सुरू केलेले काम आज संस्था जव्हार तालुक्यातील साडेचारशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांना दर वर्षी शैक्षणिक पालकत्व मिळवून देते. ज्यात शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी संस्था सहकार्य करते. या विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात टिकविणे व त्यांच्या उच्च शिक्षणाची जबाबदारी घेणे या सर्व गोष्टींकडे आवर्जून लक्ष दिले जाते, सुरुवातीला प्रवाहात आलेले विद्यार्थी इंजिनीरिंग, आय टी आय व काही विद्यार्थी स्पर्धा परीक्षा तयारी करत आहेत. आज विविध भागांमध्ये अनाथांचे नाथ म्हणून ओळखले जाते प्राथमिक स्तरावरील विद्यार्थी साठी ५०० रू, माध्यमिक साठी १००० , उच्च शिक्षण घेणारे विद्यार्थी १५०० तसेच व्यावसायिक शिक्षण घेणारे विद्यार्थी यांच्यासाठी प्रती महा १००० असे विविध दाते शोधून संस्था विद्यार्थ्यांना शैक्षणिक पालकत्व मिळवून देते शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यावर भर देत आहे.

जव्हार व औरंगाबाद या ठिकाणी किमान ३० अनाथ विद्यार्थी निवासी राहून शिक्षण व संस्कार घेतील असे गुरुकुल लवकरच सुरू करणेचा संस्थेचा मानस आहे . यासाठी मासिक १०० रुपये पासून, १००० रुपये पर्यंत मदत करणारे दाते शोधून सामान्य व्यक्तीला सामाजिक कार्यात खारीचा वाटा उचलण्याचे श्रेय संस्था मिळवून देते.

सामाजिक कामाच्या सुलभते नुसार कामाचे विभाग व अनाथांसाठी केंद्र पालक असे सूक्ष्म नियोजन संस्थेने केले आहे. विविध विभाग प्रमुख जसे
•अनाथ विद्यार्थी विभाग: गजानन तंवर
•शैक्षणिक विभाग: रोहित कोळी
•कृषी विभाग: बळीराम मुरमे
•स्पर्धा विभाग: नितीन गोडसे
•महिला सशक्तीकरण: मेघा भदाणे
•जाहिरात विभाग: संदीप भदाणे
•पुरस्कार विभाग: प्रतिमा आणि अनिल सारकते
•उद्योग सहयोग विभाग: अक्षय उजेड
•गणवेश विभाग: मोनिका कोलते
असे विभाग प्रमुख आपले विभाग सांभाळतात. काही जिल्हा प्रतिनिधी आपल्या जिल्यातील कामे सांभाळतात •औरंगाबाद: अनिता मोरे/ ओळेकर
•पालघर: राजेश पढेर
•बोईसर: सोनल कापडणेकर
•ठाणे: सायली राऊत

याबरोबरच अनाथ विद्यार्थी तालुक्यातील शैक्षणिक केंद्र निहाय पालक म्हणून अनिल तमलवार , अनिल धिंडा, जयेंद्र धिंडा, राजेंद्र गोफणे, धर्मराज तांबे, भागवत मुंडे, किरणकुमार बंडावार, मोहसिन शेख, जयवंत लोहार, विष्णु मौळे , जयसिंग राठोड , संदीप खेडकर, भरत गावीत, मच्छिंद्र देवडे, अमोल काकडे, सखाराम घाटाळ, राहुल शिंदे , सौ. आशा राठोड आदी विभाग प्रमुख अनाथ विद्यार्थी केंद्र पालक नियुक्त केली आहेत. वर्धापन दिनी विविध दाते, मासिक सदस्य , पालक या सर्वांनी आईश्री संस्थेवरती दाखवलेला विश्वास, स्नेह, आपले पणाची भावना हे ह्यामुळे गेल्या दोन वर्षात विविध कामे शक्य झाली आहेत, असे संस्थेचे अध्यक्ष कृष्णा मुरमे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *