आज कोरोना महामारीमुळे देशातील शाळा, महाविद्यालये बंद झालेली आहेत. त्यामुळे ऑनलाईन शिक्षणाचा उदय झाला आहे. तंत्रज्ञानाच्या युगात ऑनलाईन शिक्षण काळाची गरज समजून ऑनलाईन शिक्षणाचा अवलंब करता येईलही. ऑनलाईन शिक्षण महाविद्यालयीन विद्यार्थी व शहरी भागातील विद्यार्थी यांच्यासाठी काही प्रमाणात यशस्वी होईल ही पण खेड्यातील विद्यार्थ्याच काय? काही विद्यार्थ्याच्या पालकांकडे गरिबीमुळे मजुरी करीत असल्याने साधा मोबाईल नाही; ते कसे घेणार ऑनलाईन शिक्षण. खेड्यात याचे प्रमाण ७५% आहे आणि काही २५% विद्यार्थ्याच्या पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल असतीलही पण ते खरच आपल्या मुलांना मोबाईल देत असतील का? किंवा दिले ही तरी मुले खरच ऑनलाईन अभ्यास करत असतील का?
असाच एका पालकाला फोन केला की तुमच्या मुलांकरिता मी रोज ऑनलाईन अभ्यास पाठवीत आहे; तेव्हा तुम्ही त्याचा अभ्यास घेत जा. तर पालक म्हणतात ” घरात एकच अँड्रॉइड मोबाईल.. तो ही मी कामावर सोबत घेऊन जातो. सायंकाळी आल्यावर मोबाईल दिला की तो अभ्यासाच्या नावाने मोबाईल वर गेम खेळत बसतो. गुरुजी हे पोर ऑनलाईन बिनलाईन काही शिकत नाहीत तुमचंच ऐकतात आणि तुम्ही शिकविले तर शिकतात.” अशी परिस्थिती आहे खेडेगावातील ऑनलाईन शिक्षणाची.
तर मग खरच खेड्यातील मुले ऑनलाईन शिक्षण शिकतील का? आणि वर्गातील २० मुलांपैकी ५ मुले शिकली म्हणजे ऑनलाईन शिक्षण यशस्वी झाले म्हणता येईल का? तर अजिबात नाही. राज्यातील २५% विद्यार्थी, पालकांनीच ऑनलाईन शिक्षणास पसंती दर्शवली तर ७५% विद्यार्थी, पालकांनी प्रत्यक्ष वर्गातील शिक्षणास पसंती दर्शवली.एका वृत्तवाहिनीवर झालेल्या परिसंवादात काही शिक्षणतज्ज्ञ आणि पालकांनी ऑनलाईन शिक्षणाबाबत मांडलेली मते
- श्री.माधव चव्हाण (शिक्षणतज्ञ) : शाळा उघडणे या शिवाय दुसरा पर्याय नाही.
- श्री.सुनील चौधरी (पालक प्रतिनिधी) : Online शिक्षण पालकांना शहरी भागात ठीक आहे परंतू ग्रामीण ठिकाणी हे शक्य नाही. Online शिक्षणाचा हेतू fees मागणीसाठी जास्त प्रमाणात केला जात आहे. Online मुळे मुलं स्क्रीनवर जास्त वेळ असतात.
- श्री.समीर दलवाई : पालकांनी मुलांना खास वेळ दिला पाहिजे. मुलांना आळशी बनवू नका. घरी होम स्कूल चा बोर्ड लावून घरच्या घरी २/३ तासासाठी तरी मुलांना काही ऍक्टिव्हिटी द्या.
- श्री.भाऊ चासकर : ग्रामीण भागात स्मार्टफोन आणि इंटरनेट चा वापर करणारी मुले फक्त २०% ते ३०% आहेत.
- श्री. रमेश जोशी (शिक्षणतज्ञ) : अँड्रॉइड एज्युकेशन साठी जास्त आग्रह धरू नये.
शिक्षणतज्ज्ञ यांच्या मतानुसार ऑनलाईन शिक्षण सध्यातरी अयशस्वी आहे. तरीपण या ऑनलाईन शिक्षणासाठी शासन सक्ती करत असल्याने गुरुजींचा ताण वाढण्याची शक्यता आहे. सर्वांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्याने त्यांना ऑनलाईन शिक्षण देण्यास अडचण होत आहे आणि गुरुजी वारंवार फोन करून व्हाट्सअप्प वरती माहिती पाठवीत असल्याने विद्यार्थ्यांचे पालक पण हैराण झाले आहेत. शिक्षक ऑनलाईन शिक्षण १००% विद्यार्थ्यांपर्यंत कसे पोहचवावे व पालक स्वतःच्या पाल्याला ऑनलाईन कसे शिकवावे यासाठी संभ्रमात पडले आहेत.
एकंदरित, ऑनलाईन शिक्षण हा अती आग्रहाचा विषय नक्कीच नाही.. पूरक शिक्षण म्हणून त्याचा वापर करता ही येईल; परंतु मुख्य माध्यम म्हणून त्याकडे पाहणे आजच्या घडीला आत्मघातकी ठरेल..!
– लखन साखरे ( लेखक स्वतः याच क्षेत्रात कार्यरत आहेत.)
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री