अन्वयार्थ – संघटना, नेते आणि कार्यकर्ते

नेतेपणाचे प्रदर्शन केल्याने समस्याचे समाधान होणार नाही. नेतेपणाचे प्रदर्शन केल्याने तुम्हाला मान्यता मिळणार नाही. कारण आपल्या विषयी निरीक्षण करणारे लोक समाजात आहेत. याची नेहमी आठवण ठेवली पाहिजे की, लोक आपले निरीक्षण करीत आहेत. या भ्रमात राहू नये की, कोणीही तुम्हाला पाहत नाही. लोक तुम्हाला पाहत असतात, तुमचे निरीक्षण करीत असतात पण बोलत नाहीत, ही वेगळी गोष्ट आहे. सार्वजनिक जीवनात प्रत्येक व्यक्तीच्या कृतीवर प्रत्येकाचे लक्ष असते. फरक एवढा असतो की, ते लोक बोलत नाहीत.

संघटनेत काम करणाऱ्या एखाद्या कार्यकर्त्यांनी संघटनेचा उद्देश बाजूला ठेवून जर आपला व्यक्तिगत उद्देश ठेवला तर अशा लोकांसमोर केवळ दोन पर्याय आहेत. एक पर्याय आहे की, त्याने संघटनेत काम करणे सोडावे. दुसरा पर्याय, संघटनेचा उद्देश पूर्ण करण्यासाठी आपली सर्व शक्ती लावली पाहिजे. जो व्यक्ती संघटनेचा उद्देश पूर्ण करण्यासाठी काम करेल, संघटनेच्या उद्देशासोबत त्याचा व्यक्तिगत उद्देश आपोआप पूर्ण होईल. कसे? त्याला वाटते की समाजाकडून नेता म्हणून मान्यता मिळावी, जर त्याने परफार्मन्स दाखविला, स्पिरिट ठेवून काम केले तर निश्चितपणे समाजाची मान्यता मिळेल. मान्यता मिळाली तर व्यक्तिगत उद्देश ही पूर्ण होईल. पण व्यक्तिगत उद्देश पूर्ण करताना हे अवश्य ध्यानात ठेवले पाहिजे की, ज्या उद्देशासाठी संघटनेची निर्मिती झाली आहे तो उद्देश सर्वात जास्त महत्त्वाचा आहे. ही गोष्ट ध्यानात ठेवूनच प्रत्येक कार्यकर्त्यांनी काम केले पाहिजे.

संघटनेत फूट पडण्याची स्थिती थांबविण्यासाठी देखभालीचे फार मोठे तंत्र संघटनेच्या माध्यमातून कार्यान्वित केले आहे. संघटनेत कोणताही कार्यकर्ता फूट पडणार नाही यासाठी दोन गोष्टी केल्या पाहिजेत. पहिली, कार्य करतांना या गोष्टीचे प्रशिक्षण दिले जाईल की, फूट पाडण्याच्या स्थितीत कार्यकर्त्यांनी कसा निर्णय घेतला पाहिजे. याशिवाय संघटना काय आहे? कशी चालते? कसा परिणाम दिसतो याविषयीही प्रशिक्षण दिले जाईल, जेणेकरून संघटनेत फूट पडणार नाही. जे साधारण कार्यकर्ते आहेत त्यांना संघटनेचा उद्देश, संघटनेची विचारधारा, कार्यक्रम आणि त्यांना घेऊन चालणारे कार्यकर्ते यांच्यावर विश्वास ठेवून काम करावे लागेल. छोट्या गोष्टीवर ध्यान देण्याऐवजी मोठे लक्ष्य मिळविण्यासाठी आपली संपूर्ण ताकद लावली तर खूप लवकर संघटना आपला उद्देश व ध्येयापर्यंत पोहोचू शकते.

                                                                                                                    -सुधीर कांबळे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *