अन्वयार्थ – म्हणूनच तर त्यांची कार्यतत्पर, लोकसेवक ही बिरुदे फक्त डिजिटल बॅनर पुरती मर्यादित राहातं नाहीत..!
दमदार खासदार डॉ श्रीकांत शिंदे..!



सध्या कोरोनाचे संकट जगभरात धुमाकूळ घालत आहे. त्यात लॉकडाऊनमुळे अर्थव्यवस्थेचे कंबरडे देखील मोडले आहे. अश्या परिस्थितीत सर्वजण हतबल असताना सरकार, प्रशासन अतिशय आश्वासक पाऊले उचलून या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या परिस्थितीत लोकप्रतिनिधी देखील घरीच अडकून पडले आहेत, पण तिथूनही काही उपक्रम राबवत आहेत.! तर काही ठिकाणी मतदारसंघातून प्रतिनिधी हरवले असल्याचे देखील सोशल मीडियातून व्हायरल होत आहे. परंतु याला छेद देत कल्याण लोकसभेचे खासदार मात्र मतदारसंघात शहरी, ग्रामीण असा भेद न करता सर्वदूर पोहचून आपले कर्तव्य पार पाडत आहेत.

निवडणुकीच्या काळात आगरी आणि बिगर आगरी उमेदवार यावरून काही थोड्या लोकांनी ग्रामीण भागात खासदारांच्या विरोधात अगदी खालच्या पातळीला जावून राजकारण केले होते.. परंतु सामान्य नागरिकांनी त्या जातीच्या राजकारणाला थारा न देता कार्यतत्पर म्हणून खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांना मतदानातून भरघोस प्रतिसाद दिला होता. त्या साऱ्यांच्या विश्वासाला आपल्या कामातून खासदार डॉ श्रीकांत शिंदे आता या संकटात देखील नेहमीसारखे सार्थ ठरवत आहेत.

वैद्यकीय सेवा आणि साधने :
या संकटकाळात देखील कळव्यापासून अंबरनाथ पर्यंत सर्व परीसरात कोरोना पसरू नये तसेच यावर यशस्वीरीत्या मात करण्यासाठी जिल्हाधिकारी, आयुक्त, मुख्याधिकारी, वैद्यकिय अधिकारी, डॉक्टर असोसिएशन यांना प्रत्यक्ष भेटून योग्य त्या सुचना देत असतात. एवढे करूनच न थांबता प्रत्यक्ष रुग्णालयांनाही भेटी देउन तेथील परिस्थितीवर देखील ते लक्ष देवून आहेत. स्वतंत्र लॅब मंजूर करून घेऊन महापालिकेना व्हेंटिलेटर देखील पुरवत आहेत.

नागरिकांची अविरत सेवा:
७ एप्रिल पासून आजतागायत खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुमारे ५० हजाराहून अधिक नागरिकांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून हे काम आजही अव्याहतपणे चालूच आहे. तसेच ज्याचे तापमान अधिक आहे किंवा प्रथम दर्शनी कोविड सदृश्य लक्षणे आहेत त्यांना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून दिली असून हे काम पुढेही चालूच आहे.

पोलिस, पत्रकार यांच्या आरोग्याची काळजी :
ठाणे शहर, कल्याण डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ, कळवा मुंब्रा आदी आपल्या मतदारसंघातील २४ तास सेवा देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांची व पत्रकारांची देखील तपासणी करून फिरता दवाखाना ही संकल्पना या निमित्ताने राबवली. याच्या माध्यमातून ज्यांचे कुणीही नाही अशा निर्वाहहीन गरीब नागरीकांची वैद्यकीय तपासणी सुध्दा फिरत्या दवाखान्याद्वारे करण्याचे काम चालू आहे.

अहोरात्र अन्नछत्र :
हातावर पोट असणाऱ्यांसाठी आत्तापर्यंत हजारो नागरीकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले असून रोज सकाळ संध्याकाळ तब्बल २५००० लोकांना ( म्हणजे दिवसाला ५०,०००) जेवणाची व्यवस्था एक विशेष कम्युनिटी किचन स्थापन करून त्यामार्फत शेकडो कार्यकर्ते करीत आहेत..

रिक्षा चालकांना मायेचा आधार :
अजुन एक आगळावेगळा उपक्रम म्हणजे आपल्या लोकसभा क्षेत्रातील ५०,००० हून अधिक रिक्षा चालकांना मायेचा आधार म्हणून अन्नधान्य वाटप देखील सुरू करण्यात आले आहेत..

एकंदरीत, अगदी कोणताच भेदभाव न करता ज्या प्रकारे खासदार डॉ श्रीकांत शिंदे काम करत आहेत, ते वाखाण्याजोगे असेच आहे. केरळ मधील नैसर्गिक आपत्ती, महाराष्ट्रातील पूरस्थिती असेल किंवा अगदी कोणतेही संकट असले तरी आपल्या पित्याप्रमाने नेहमीच खासदार फ्रंट वर येऊन लढत असतात, म्हणूनच तर त्यांची कार्यतत्पर, लोकसेवक ही बिरुदे फक्त डिजिटल बॅनर पुरती मर्यादित राहातं नाहीत..!


3 Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *