अन्वयार्थ : राजभवन राजकारणाचे नवे केंद्र

राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियांरीची काल भेट घेतली. त्यानंतर माजी मुख्यमंत्री नारायण राणे हे देखील भेटले. मात्र त्या आधी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनीही राज्यपालांशी चर्चा केली होती. या तीनही भेटींची छायाचित्रे माध्यमांत प्रसिद्ध झाली. त्यामुळे राजभवनावर नेत्यांची एवढी रिघ का, अशी शंकाही उपस्थित झाली. महाराष्ट्रात पुन्हा राजकीय भूकंप येणार का.? यावर देखील आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागल्या आहेत.

यातील काही नेत्यांना खुद्द कोशियारी यांनी निमंत्रण दिले होते. त्यांची सक्रियता हा आता चर्चेचा विषय बनली आहे. कोरोनाच्या परिस्थितीवर मुकाबला करण्यासाठी ही खलबते सुरू असावीत, असाही तर्क लावण्यात येत आहे. मात्र हा तर्कच आहे.

या साऱ्या भेटींमध्ये शनिवार व रविवारी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांनी प्रकाशात न आलेल्या भेटीही घेतल्याचे माहिती आता समोर येते आहे .या भेटीत महत्वाची भेट मानली जाते ती भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची. त्यांना राज्यपालांकडूनच आमंत्रण मिळाल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, सोमय्या यांनी उद्धव ठाकरेंवर सातत्याने आरोप केले आहेत. शिवसेनेचाही त्यांच्यावरील राग शांत झालेला नाही. संजय राऊत यांच्या २३ मे रोजीच्या भेटीनंतर लगेचच सोमय्या यांची त्याच दिवशी भेट का झाली? की तो योगायोग होता की कसे, याची चर्चा सुरू आहे. आणि विशेष म्हणजे त्यानंतर लगेचच शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनीही राजभवन गाठले होते, अशी माहिती आता समोर येत आहे.

 दरम्यान, संजय राऊत यांनी राज्यपालांना वडील म्हणून दिलेला नवा कॉर्नर, त्यांनतर चहासाठी भेटलेले शरद पवार, सरकारला नारळ द्या म्हणून भेटलेले नारायण राणे यांनी यांच्या दरम्यान राज्यपालांना भेटलेले मिलिंद नार्वेकर व किरीट सोमय्या यामुळे राजभवन राजकारणाचे केंद्र बनत आहे. एवढ्या घडामोडी पाहता महाराष्ट्राला नवीन काहीतरी पाहायला मिळतय का हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे..! 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *