सोशल मीडियातील टिका थांबवणे हि जीवनावश्यक सेवा आहे का ?
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी भाजप नेत्यांना दिल्या हास्य दिनाच्या शुभेच्छा..!



| मुंबई | जनतेकडून भाजपवर टीका केली जात असतानाच पक्षाकडून मात्र रडीचा डाव खेळला जात आहे, ते प्रथमत: बंद करावं असा म्हणत राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अनोख्या अंदाजात भाजपला कोपरखळी मारली. बरं यावेळी त्यांनी जागतिक हास्य दिनाच्या शुभेच्छाही दिल्या. एकामागून एक सलग ट्विट करत त्यांनी विरोधी पक्षावर निशाणा साधला.

मुळात, भाजप नेत्यांची खिल्ली उडवली जाते होते म्हणून विरोधी पक्ष नेत्यांनी पोलिसांत तक्रार केली याच उत्तर राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अनोख्या शैलीत दिलं. काल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी टीकेची झोड उठवल्यानंतर आज राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी शालजोडे मारले आहेत. 

‘भाजपा नेते सोशल मीडियात त्यांच्या चुकांवर बोट ठेवणार्‍या नागरिकांवर कारवाईची मागणी करत आहेत. हि मागणी करण्यापुर्वी त्यांनी ‘आघाडी बिघाडी’, ‘देवेंद्र फडणवीस फॉर महाराष्ट्र’ पेजेस कोण चालवत होते, त्याच्या जाहिराती करण्यासाठी कोण पैसे देत होते, याची माहिती आधी जाहीर करावी.

आज संपूर्ण जग कोरोना सोबत लढत असताना, भाजपा नेते मात्र राज्यपाल, पोलीस आयुक्त यांच्याकडे जाऊन आमच्या वरील टिका थांबवा, अशी मागणी करत आहेत. यातून भाजपा नेत्यांचे प्राधान्यक्रम कोणते आहेत, हेच यातून स्पष्ट होते. सोशल मीडियातील टिका थांबवणे हि जीवनावश्यक सेवा आहे का ?’, असं ट्विट त्यांनी केलं.

पुढे भाजपने आता जनतेकडून टीका होत असताना रडीचा डाव खेळू नये म्हणत आपल्या पक्षावरही अश्लील टीका झाल्याची बाब अधोरेखित केली. थोडक्यात काय, तर जयंत पाटील यांनी हास्य दिनाच्या निमित्ताने विरोधी पक्षावर खऱ्या अर्थानं नेम साधला, असं म्हणायला अधिकचा वाव आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *