ज्योती कुमारीच्या धिरोदत्त वागण्याला इवांका ट्रम्प यांचा देखील सलाम..!
आजारी वडिलांना सायकलवर बसून सात दिवसांत पार केले तब्बल १२०० किमी अंतर..!

| मुंबई | लॉकाउनमुळे एकीकडे स्थलांतरित मजूर पायी किंवा मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. यादरम्यान १५ वर्षीय ज्योती कुमारीचं नाव गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे.  ज्योती कुमारीने आपल्या आजारी वडिलांना सायकलवर बसून सात दिवसांत तब्बल १२०० किमी अंतर प्रवास केला आहे. ज्योतीच्या या जिद्दीचं कौतुक केलं जात असून सायकलिंग फेडरेशननेही तिची दखल घेतली असून चाचणीसाठी बोलावलं आहे. 

पण सर्वात अविश्वसनीय आणि अचंबित करणारी गोष्ट म्हणजे  अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मुलगी इवांका ट्रम्प यांनी देखील ज्योती कुमारीच्या या अशक्यप्राय अशा कामगिरीची दखल घेतली आहे. इवांका यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटला ज्योती कुमारीची बातमी शेअर केली आहे.  परिस्थितीने हतबल असणाऱ्या ज्योतीने आपल्या जिद्दीच्या जोरावर आज खूप मोठी मजल मारली आहे.

नेमके काय घडले:
ज्योती कुमारी लॉकडाउन जाहीर होण्याआधी गुरुग्राम येथे वास्तव्यास होती. ज्योतीचे वडील मोहन पासवान गुरुग्राममध्ये रिक्षा चालवत होते. लॉकडाउन काळात एका छोट्या अपघातात ते जखमी झाल्यामुळे त्यांचा रोजगार तुटला. आजारी वडिलांना कोणत्याही परिस्थितीत बिहारला आपल्या गावी न्यायाचं असल्याने अखेर तिने सायकवरुन वडिलांनी नेण्याचा निश्चय केला. इतकंच नाही तर सात दिवसांत तिने १२०० किमीचा टप्पा गाठत वडिलांना सुखरुप घरी पोहोचवलं.

सायकल फेडरेशनने केले गौरवित..
ज्योती कुमारीची कहाणी ऐकल्यानंतर सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने ज्योतीला चाचणीसाठी बोलावलं आहे. “ज्योतीने Trials यशस्वीपणे पूर्ण केली, तर Nation Cycleing Academy च्या कॉम्प्लेक्स मध्ये Trainee म्हणून तिची निवड होऊ शकते.” सायकलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष ओंकार सिंह यांनी पीटीआयला माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *