| ठाणे | राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती आता स्थिर झाली असून राज्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. मात्र दुसरीकडे ठाण्यातील अन्य एका आमदाराला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
सत्ताधारी पक्षातील हा आमदार असून काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या आमदाराला कॉरण्टाइन करण्यात आले होते. त्यानंतर आता या आमदाराचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ठाण्यासाठी ही अतिशय चिंतेची बाब मानली जात आहे. तसेच ठाण्यातील आकडा देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.
दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती स्थिर असून सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहिल्यापेक्षा माझी तब्येत आता खूप चांगली असल्याची माहिती त्यांनी ट्विटर वरून दिली आहे..
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाशी देत असलेल्या माझ्या लढाईस यश आलेलं असून मी आज सुखरूप घरी जात आहे. यापुढे ही तुमचं प्रेम आणि आशिर्वाद असंच राहू द्या. परत एकदा त्याच उत्साहात आणि त्याच जोमात पुरोगामी महाराष्ट्रासाठी पुन्हा लढण्यास सज्ज होऊया.
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 10, 2020
तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार महिनाभर आराम करून मी पुन्हा आपल्या सेवेत हजर होईल असे सांगत त्यांनी एक शेर देखील ट्विट केला आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .