जितेंद्र आव्हाड कोरोना मुक्त ; ठाण्यातील अजुन एका आमदाराला कोरोनाची लागण..!

| ठाणे | राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती आता स्थिर झाली असून राज्यासाठी ही आनंदाची बातमी आहे.  मात्र दुसरीकडे ठाण्यातील अन्य एका आमदाराला कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

सत्ताधारी पक्षातील हा आमदार असून काही दिवसांपूर्वी त्यांच्या पत्नीचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे या आमदाराला कॉरण्टाइन करण्यात आले होते. त्यानंतर आता या आमदाराचाही रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे ठाण्यासाठी ही अतिशय चिंतेची बाब मानली जात आहे. तसेच ठाण्यातील आकडा देखील दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांची प्रकृती स्थिर असून सध्या त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पहिल्यापेक्षा माझी तब्येत आता खूप चांगली असल्याची माहिती त्यांनी ट्विटर वरून दिली आहे..

तसेच डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार महिनाभर आराम करून मी पुन्हा आपल्या सेवेत हजर होईल असे सांगत त्यांनी एक शेर देखील ट्विट केला आहे.

अपने कदमों के काबिलियत पर विश्वास करता हूं , कितनी बार तूटा लेकीन अपनो के लिये जीता हूं , चलता रहूंगा पथपर चलने मैं माहीर बन जाऊंगा या तो मंजिल मिल जायेगी या अच्छा मुशाफिर बन जाऊंगा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *