कल्याण डोंबिवली पुन्हा लॉक डाऊन च्या दिशेने..!

| कल्याण | कल्याण डोंबिवलीत कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहे. या वाढत्या रुग्ण संख्येला आळा घालण्यासाठी आमदारांनी शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याची मागणी पार पडलेल्या पालकमंत्र्यांच्या बैठकीत केली आहे. किमान १० ते १५ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात यावा अशी मागणी केली आहे. आयुक्तांच्या पातळीवर शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो.

कल्याण अत्रे रंगमंदिरात कोरोनाच्या पाश्र्वभूमीवर पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी कॉन्फरन्स हॉलमध्ये बैठक घेतली. अनलॉक-वनमध्ये शहरातील जनजीवन पुन्हा सुरु झाले होते. लोकांना दिलासा मिळाला होता. मात्र शेजारच्या भिवंडी महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांची संख्या वाढल्याने महासभेने शहरात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेतला. कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतही कोरोना रुग्णांची संख्या वाढली असल्याने मृतांचा आकडा ६९ वर पोहचला आहे. कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आणण्यासाठी पुन्हा १५ दिवसाचा लॉकडाऊन लागू करावा अशी मागणी मनसेचे आमदार पाटील यांनी केली.

या मागणीला आमदार चव्हाण, गायकवाड, भोईर यांनी उचलून धरले. या मागणीचा विचार प्रशासनाने करावा अशा सूचना पालकमंत्री शिंदे यांनी महापालिका आयुक्तांना दिल्या आहेत. यावेळी आयुक्तांसह महापौर विनिता राणे, खासदार डॉ श्रीकांत शिंदे हे देखील उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *