कमाल बुवा : ६०० पैकी ६०० गुण मिळवून या विद्यार्थिनींने रचला इतिहास..!

| लखनऊ | केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ म्हणजेच सीबीएसई परीक्षेत लखनऊच्या दिव्यांशी जैन हीने १२ वीच्या परीक्षेत ६०० पैकी ६०० गुण मिळवून इतिहास रचला. नवयुग रेडियंस स्कूलची विद्यार्थिनी असलेल्या दिव्यांशीने ही सफलता मिळवल्यानंतर तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

दिव्यांशीच्या मते, मला स्वप्नातही कधी वाटले नव्हते की, मला पैकीच्या पैकी गुण मिळतील. पण मी सुरुवातीपासूनच अभ्यास करत होते. विशेष म्हणजे मी स्वअभ्यासाला प्राधान्य दिले असे ही म्हटले आहे.

दिव्यांशीला हायस्कूल मध्ये ९७.६ टक्के गुण मिळाले आहेत. दिव्यांशीचे वडील राकेश प्रकाश जैन हे बिझनेसमन असून आई सीमा जैन या गृहिणी आहेत.

दिव्यांशीचे गुणपत्रक :

इंग्लिश – १००
संस्कृत – १००
इतिहास – १००
भूगोल – १००
इंश्योरेंस – १००
इकॉनॉमिक्स – १००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *