खऱ्या अर्थाने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केलात तसेच विज्ञान शिक्षकांनी केलेले कार्य कौतुकास्पद – मिलिंददादा गाजरे

| जळगाव / दैनिक लोकशक्ती ऑनलाईन |    नोबेल पुरस्कार सन्मानित भारतरत्न सी व्ही रमण यांच्या रमन इफेक्ट या शोधाच्या स्मृती आणि गौरव प्रित्यर्थ राष्ट्रीय विज्ञान दिनाच्या निमित्ताने ‘रमण सायंस कार्निवल’ श्री शारदा माध्यमिक विद्यालय दिपनगर येथे रमण सायन्स अँड टेक्नॉलॉजी फाउंडेशन गुजरात संचलित उषा नॅशनल सायन्स टेक्नो रिसर्च सेंटर भुसावळ आणि रोटरी क्लब ऑफ भुसावळ ताप्ती व्हॅली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला. यात सी व्ही रमण यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांच्या रमन इफेक्ट या शोधाविषयी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

                  कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी खऱ्या अर्थाने राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा केलात तसेच विज्ञान शिक्षकांनी केलेले कार्य कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांनी संशोधक वृत्ती जोपासावी. प्रयोगशाळेत विविध प्रात्यक्षिक स्वतः करावीत आणि विज्ञान शिक्षकांनी त्यांना स्फूर्ती व प्रेरणा द्यावी आणि त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन वृद्धीगंत करावा असे शारदा शिक्षण मंडळाचे संचालक मिलिंददादा गाजरे यांनी मार्गदर्शन केले.

                      यावेळी विद्यालयातील विज्ञान शिक्षक प्राचार्य जी डी चौधरी, पर्यवेक्षक जे बी पाटील, नीलिमा विलास पाटील, रूपाली राकेश राणे, टी पी राणे, आर डी तायडे, सोनवणे रेखा चौधरी सरोदे, एन जे भालेराव इत्यादीं विज्ञान शिक्षकांचा सन्मानपत्र व सिल्वर मेडल देऊन विशेष गौरव करण्यात आला आणि त्यांच्या विज्ञान कार्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. यानंतर विज्ञान प्रयोग कार्यशाळेत विद्यार्थ्यांना विविध प्रयोगांच्या माध्यमातून वैज्ञानिक तत्वे समजावण्यात आली.

विद्यार्थ्यांनी भारतरत्न सी व्ही रमण यांचा जीवनपट समजून त्यांच्यासारखे बनण्याचा प्रयत्न केला पाहिजे.- जीवन महाजन, अध्यक्ष, उषा नॅशनल सायन्स टेक्नो रीसर्च सेंटर, भुसावळ.

                        वैज्ञानिक पद्धतीने आपण विचार केला पाहिजे, संशोधन केले पाहिजे, आपल्या मनात प्रश्न निर्माण झाले पाहिजेत आणि त्यांची उत्तरं आपण शोधली पाहिजेत तसेच शास्त्रज्ञ कशा प्रकारे जीवन जगले आहेत हे समजून आपणही त्यांच्यासारखे विचार करण्याचा, संशोधन करण्याचा आणि त्यांच्यासारखेच बनण्याचा विचार केला पाहिजे तेव्हाच आपणही शास्त्रज्ञ बनू शकू असा विचार जीवन महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना मांडला.

                 यानंतर विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन लावण्यात आलेले होते विद्यार्थ्यांनी प्रदर्शनामधील विविध तक्ते आणि विविध प्रयोगांचे किट याविषयी माहिती मिळवली. सदर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक जी डी चौधरी, कार्यक्रमाचे उद्घाटक मिलिंद गाजरे, प्रतिमा पूजन रोटरी अध्यक्ष डॉ संजू भटकर व प्रमुख मार्गदर्शक जीवन महाजन अध्यक्ष, उषा सायन्स सेंटर, विविध प्रयोगाचे प्रात्यक्षिक धीरज चौधरी यांनी करून दाखवले व्यासपीठावर आयटीआयचे बहिस्त पर्यवेक्षक माळी सर व गांगुर्डे मॅडम यांचा सहभाग होता. सूत्रसंचालन जे बी पाटील, प्रास्ताविक डॉ भटकर व आभार प्रदर्शन मनीषा पाटील यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस एस पवार, गणेश सरोदे, मीना नेरकर, शोभा जंगले, अजय झोपे यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published.