घ्या जाणून : मुंबई महानगर क्षेत्रात इतके आहेत कंटेन्मेंट झोन..!

| मुंबई | लॉकडाउनमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणण्याचा निर्णय केंद्र व राज्य सरकारकडून घेण्यात येत असला, तरी सध्याच्या स्थितीत महामुंबई परिसरात साधारणत: दोन हजारांवर ठिकाणे कन्टेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे तेथील निर्बंध लवकर उठण्याची शक्यता कमी आहे. सरकारच्या नव्या घोषणेनुसार तिथे नियमांचे कडक पालन करावे लागणार आहे. परिणामी, हे झोन उठवण्याच्या, त्यात बदल करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. हे झोन ठरण्याचे नियम शिथील करावेत, अशी मागणीही सुरू झाली आहे.(number of contentment zone in MMRDA)

 मुंबई महानगर प्राधिकरण क्षेत्रात मुंबई ७१७, ठाणे २३९, कल्याण-डोंबिवली १६८, नवी मुंबई १११, मीरा-भाईदर १४२, वसई-विरार १८६ ही महापालिका क्षेत्रे आणि पालघर ३८, रायगड ११७ हे दोन जिल्हे तसेच भिवंडी, उल्हासनगर महापालिका मिळून या जवळपास दोन हजार कंटेन्मेंट झोन आहेत. (number of contentment zone in MMRDA)

मुंबई शहर व उपनगरात मुंबई महापालिकेने कंटेन्मेंट झोनमधील ३ हजार ३३७ इमारती सील केल्या आहेत. यातील घरांची संख्या एक लाख ३०,४९३ आहे. सील केलेल्या परिसरातील एकूण लोकसंख्या ६ लाख २८ हजार ३७७ आहे. तर येथील कोरोना रुग्णांची संख्या ६ हजार ६६२ आहे.

दरम्यान, मुंबईत आता कुर्ल्यातील सर्वाधिक कंटेनमेंट झोन आहेत. मुंबईतील ७१७ कंटेनमेंट झोनमधील घरांची एकूण संख्या ९ लाख ४७ हजार २४६ आहे. तर येथील एकूण लोकसंख्या ४२ लाख २६ हजार १७९ एवढी असून एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १४ हजार ४८४ आहे. एल विभागात कुर्ला येथे ११४ एवढे म्हणजे सर्वाधिक कंटेनमेंट झोन आहेत. आर/नॉर्थमध्ये ६०, आर/साउथमध्ये ४०, एसमध्ये ६६, एम/ईस्टमध्ये ६६ कंटेनमेंट झोन आहेत. मध्य मुंबई, पूर्व आणि पश्चिम उपनगरातील सील केलेल्या इमारतींची संख्या अधिक आहे. के/डब्ल्यू विभागात ३००, आर/सी विभागात २३४, एफ/नॉर्थ विभागात २१५ तर एल विभागात २०२ इमारती सील केल्या आहेत.(number of contentment zone in MMRDA)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *