चला गोव्याक फिरायला; गोवा पर्यटकांसाठी खुला..!

| गोवा | कोरोनामुळे अख्खं जग जणू ठप्प झालं आहे. लॉकडाऊनमुळे अनेक लोक घरांमध्ये बंद आहेत. भारतातही कोरोना वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. सध्या देशात लॉकडाऊनचा ५ वा टप्पा सुरु असून देशात जनजीवन पुर्वपदावर आणण्यासाठी अनलॉकची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अशातच देशात लॉकडाऊनमध्ये शिथीलता देण्यात आली असून पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र असलेल्या गोव्यातही २ जुलैपासून पर्यटन सुरु करण्यात आलं आहे. गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनी संदर्भात माहिती दिली. असं असलं तरी विदेशातील पर्यटकांना मात्र अद्याप गोव्यात येता येणार नाही, असंही ते म्हणाले.

एकदा कोरोनामुक्त झाल्यानंतर पुन्हा कोरोनाविरूद्ध लढा देणाऱ्या गोव्यानं पर्यटन खुल करण्याचं निश्चित केलं आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर गोव्याचे पर्यटनमंत्री मनोहर अजगावकर यांनी यांची घोषणा केली. राज्य सरकारनं जारी केलेल्या एसओपीप्रमाणे चालू शकणाऱ्या २५० हॉटेल्सला पर्यटन विभागाकडून सुरु करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच मेडिकल रिपोर्ट पाहून त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे.

दरम्यान, गोवा म्हणजे पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्र आहे. गोवा नेहमी पर्यटकांनी गजबजलेला पाहायला मिळतो. परंतु, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण जग ठप्प झालं आहे. गोव्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला होता. कोरोनामुक्त झालेल्या गोव्यात त्यानंतर पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव पाहायला मिळाला. अशातच अनलॉकच्या टप्प्यात आता लॉकडाऊनमुळे शांत असलेली गोव्यातील पर्यटन स्थळं पुन्हा नियमांचं पालन करत पर्यटकांसाठी खुली होणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *