चला समजून घेऊ मूडीज रेटिंग..!

| मुंबई | जगातील विविध अर्थव्यवस्थांना त्यांच्या गुंतवणूक, GDP बाबत वेगवेगळे निकष लावून मुडीज ही अमेरिकन कंपनी रेटिंग देत असते, तिच्या बाबतची माहिती समजून घेवूया..

कोण आहे ‘मूडीज’?

पतमानांकन (रेटिंग) देण्याच्या पद्धतीची सुरुवात १९०९मध्ये जॉन मूडी यांनी केली. रेटिंग देण्याचा उद्देश हाच होता की, गुंतवणूकदाराला ग्रेड दिल्यानंतर बाजारात त्याची पत निर्माण होईल. ‘मूडीज कॉर्पोरेशन’ ही ‘मूडीज इन्व्हेस्टर्सची कंपनी असून, ती क्रेडिट रेटिंग देण्याचे आणि आर्थिक बाबतीत संशोधन करण्याचे काम करते.

‘मूडीज’चे काम काय?

सध्या ‘मूडीज’ जागतिक भांडवल बाजाराचा महत्त्वपूर्ण भाग असून, ही कंपनी वित्तीय बाजाराला क्रेडिट रेटिंग (पतमानांकन), रिसर्च टूल आणि विश्लेषणाची सेवा पुरवते.

निकष कसे ठरतात?

कोणत्याही देशाचे रेटिंग निर्धारित करताना देशावरील कर्ज आणि ते चुकविण्याची क्षमता लक्षात घेतली जाते. या शिवाय रेटिंग एजन्सी त्या देशातील आर्थिक सुधारणांची गती आणि त्याचा भविष्यावर पडणारा प्रभाव आदी बाबी लक्षात घेऊन रेटिंग देतात. गुंतवणूक गुरू भरत झुनझुनवाला यांच्या मते विदेशी अथवा देशी कंपन्यांना देशाची अर्थव्यवस्था नेमकी कशी आहे, याचे आकलन करणे अवघड जाते. या पार्श्वभूमीवर त्या कंपनी रेटिंग एजन्सीची मदत घेतात. त्यानंतर कंपन्या एजन्सीच्या अहवालानुसार गुंतवणूक योजना तयार करतात. या शिवाय रेटिंग निर्धारित करताना देशातील राजकीय स्थिती, आखलेली धोरणे, आयात, निर्यात आदी बाबीही पाहिल्या जातात.

रेटिंग बदलण्याचा अर्थ

अर्थतज्ज्ञांच्या मते अर्थव्यवस्थेमध्ये सातत्याने बदल होतच असतात. मात्र, अर्थव्यवस्थेतील बदल लक्षात घेऊन त्यांना मिळणारे सॉवरेन रेटिंग सातत्याते बदलल्यास त्याचा अर्थ असा होतो की, सरकारकडून करण्यात येणाऱ्या आर्थिक सुधारणांना ‘मूडीज’ने हिरवा कंदील दाखवला आहे.

रेटिंगचा फायदा

‘मूडीज’कडून एखाद्या देशाच्या रेटिंगमध्ये सुधारणा झाल्यास त्याचे अनेक अर्थ निघतात. याचाच अर्थ देशाची अर्थव्यवस्था प्रगती करीत असून, तिचा मार्ग बरोबर आहे. अशा देशाला नवनवीन कर्जे मिळणे अतिशय सुलभ होते. शिवाय देशातील विदेशी गुंतवणूकही वाढीला लागते.(Let’s understand Moody’s rating ..!)

रेटिंगचे प्रकार

‘मूडीज’ने ग्रेड देण्यासाठी नऊ विभाग निश्चित केले आहेत. Aaa, Aa, A, Baa, Ba, Caa, Ca आणि C असे हे नऊ विभाग आहेत. या शिवाय १,२,३ असे उपविभागही असतात.

रेटिंगचे प्रकार काय दर्शवतात?

– A चा अर्थ असा की गुंतवणुकीसाठी योग्य देश.

– Baa3 रेटिंग म्हणजे देशाच्या अर्थव्यवस्थेची वाटचाल बिकट आहे. त्या देशातील व्यवस्था बिघडली असून, तेथे गुंतवणूक करणे म्हणजे संकटाला निमंत्रण देण्यासारखे आहे. भारताला आता ‘Baa3’वरून ‘Baa2’ असे रेटिंग देण्यात आले आहे. याचा अर्थच असा की देशाच्या अर्थव्यवस्थेत बरीच सुधारणा झाली आहे.

 मागील UPA सरकारच्या कार्यकालात रेटिंगमध्ये सर्वाधिक घसरण झाली होती. मात्र, तरीही त्या काळात देशाचा विकासदर अधिक होता. मात्र, मागील NDA सरकारच्या काळात विकासदर कमी असूनही रेटिंग चांगले मिळाले होते. याचाच अर्थ असा की रेटिंग आणि विकासदराचा काहीच संबंध नाही. (Let’s understand Moody’s rating ..!) 

स्त्रोत : अतुल आवटे, अर्थ अभ्यासक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *