मुंबई : अभिनेत्री मुक्ता बर्वेने वाचलेले इटालियन लेखिका फ्रान्सेसका मेलँड्रीले या इटालियन लेखिकेचे पत्र सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. इटलीत कोरोनासंदर्भात लॉकडाऊन सुरु असताना फ्रान्सेसकाने हे पत्र देशवासियांना उद्देशून लिहले आहे. या पत्राचे वाचन मुक्ता बर्वे हिने सुरु केले आणि काही तासातच हे पत्र चांगलेच चर्चेत आले. आता हे पत्र चांगलेच गाजत आहे. याची प्रस्तावना उदय सबनीस यांनी केली आहे. तर अनुवाद क्षमा देशपांडे आणि विराज मुनोत यांनी केले आहे.
इटालियन लेखिका फ्रान्सेसका मेलँड्री यांच्या ‘फ्रॉम युअर फ्युचर’ या नावाच्या पत्रात युरोपला भविष्यात नक्की कुठल्या भावनिक प्रसंगांना सामोरं जावे लागणार आहे, याची कल्पना फ्रान्सेसकाने दिली आहे. फ्रान्सेसकाचे हे अनुभव भारतीयांसाठी नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहे. यासाठी तिनं हे पत्र सोशल मीडियावर पोस्ट केले आहे.
लेखिका फ्रानसेस्का मेलँड्री या गेले तीन आठवडे, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे रोम (इटलीची राजधानी) शहरात लॉकडाऊनमध्ये अडकलेल्या असताना. त्यांनी, सर्व युरोपीयन रहिवाश्यांना उद्देशून ‘फ्रॉम युअर फ्युचर’ अर्थात ‘आपल्या भविष्यकाळाकडून’ या नावाचे एक पत्र लिहिले आहे, हे पत्र जगात अनेक वृत्तपत्रांमध्ये विविध भाषेतून प्रसिद्ध झाले आहे.