| नवी दिल्ली | ‘आयुष्मान भारत’ या आरोग्य सेवा योजनेने एक कोटी लाभार्थ्यांचा आकडा ओलांडला आहे. या मोहिमेच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे. २ वर्षांपेक्षा कमी कालावधीत ‘आयुष्मान भारत’ने मोठे यश संपादन केले आहे. या मोहिमेचा अनेकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला आहे. या योजनेचा लाभ घेणाºया लाभार्थ्यांची संख्या १ कोटी इतकी झाली असून ही जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवेची योजना ठरली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे.
One of the biggest benefits of Ayushman Bharat is portability. Beneficiaries can get top quality and affordable medical care not only where they registered but also in other parts of India. This helps those who work away from home or registered at a place where they don’t belong.
— Narendra Modi (@narendramodi) May 20, 2020
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, आम्ही आमच्या डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि ‘आयुष्मान भारत’शी संबंधित असलेल्या सर्वांचे कौतुक करतो. त्यांच्या प्रयत्नांमुळे ही योजना जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवा बनली आहे. या उपक्रमामुळे बºयाच भारतीयांचा, विशेषत: गरीब आणि दलितांचा विश्वास जिंकला आहे.
‘आयुष्मान भारत’ लाभार्थ्यांच्या संख्येने १ कोटीचा आकडा ओलांडल्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत, या उपक्रमाचा बºयाच लोकांवर सकारात्मक परिणाम झाला आहे. मी सर्व लाभार्थी व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन करतो. त्यांच्या आरोग्यासाठीही मी प्रार्थना करतो, असेही पंतप्रधान मोदी यांनी पुढे म्हटले आहे. मेघालयातील पूजा थापा या आयुष्मान भारत योजनेच्या १ कोटीव्या लाभार्थी ठरल्या. थापा यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टेलिफोनद्वारे संवाद साधला.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री