आयुष्यमान भारत योजना – जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवेची योजना..!

| नवी दिल्ली | ‘आयुष्मान भारत’ या आरोग्य सेवा योजनेने एक कोटी लाभार्थ्यांचा आकडा ओलांडला आहे. या मोहिमेच्या यशाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.  २ वर्षांपेक्षा कमी कालावधीत ‘आयुष्मान भारत’ने मोठे यश संपादन केले आहे. या मोहिमेचा अनेकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला आहे. या योजनेचा लाभ घेणाºया लाभार्थ्यांची संख्या १ कोटी इतकी झाली असून ही जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवेची योजना ठरली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत म्हटले आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, आम्ही आमच्या डॉक्टर, परिचारिका, आरोग्य कर्मचारी आणि ‘आयुष्मान भारत’शी संबंधित असलेल्या सर्वांचे कौतुक करतो. त्यांच्या प्रयत्नांमुळे ही योजना जगातील सर्वात मोठी आरोग्य सेवा बनली आहे. या उपक्रमामुळे बºयाच भारतीयांचा, विशेषत: गरीब आणि दलितांचा विश्वास जिंकला आहे.

‘आयुष्मान भारत’ लाभार्थ्यांच्या संख्येने १ कोटीचा आकडा ओलांडल्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल. दोन वर्षांपेक्षा कमी कालावधीत, या उपक्रमाचा बºयाच लोकांवर सकारात्मक परिणाम झाला आहे. मी सर्व लाभार्थी व त्यांच्या कुटुंबियांचे अभिनंदन करतो. त्यांच्या आरोग्यासाठीही मी प्रार्थना करतो, असेही पंतप्रधान मोदी यांनी पुढे म्हटले आहे. मेघालयातील पूजा थापा या आयुष्मान भारत योजनेच्या १ कोटीव्या लाभार्थी ठरल्या. थापा यांच्याशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी टेलिफोनद्वारे संवाद साधला.

Leave a Reply

Your email address will not be published.