लॉक डाऊन अजून वाढणार..?
राज्यांवर सोपविले निर्णय..!



|नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या संकटादरम्यान आज सोमवारी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. या बैठकीत पीएम मोदी यांनी लॉकडाऊन उघडण्याबाबत चर्चा केली आणि ते म्हणाले की यावर धोरण तयार करावे लागेल. राज्य सरकारला सविस्तरपणे काम करावे लागेल.

या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, राज्य सरकारने आपले धोरण तयार करावे आणि लॉकडाऊन कसे उघडावे याबाबत निर्णय घ्यावा. रेड, ग्रीन आणि ऑरेंज झोननुसार निर्णय घ्यावा. ज्या राज्यात कोरोना रुग्णांची जास्त प्रकरणे आहेत तेथे लॉकडाउन सुरूच राहील, ज्या राज्यात कमी प्रकरणे आहेत अशा जिल्ह्यांमध्ये जिल्हावार निर्णय घेतला जाईल.

‘अर्थव्यवस्थेबाबत चिंता करु नका, आपली अर्थव्यवस्था चांगली आहे.’  असेही पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने झोननुसार देशातील विविध जिल्ह्यांचे विभाजन केले आहे. १७० हून अधिक जिल्हे रेड झोनमध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे कोरोना विषाणूच्या संकटामुळे ३ मेपर्यंत देशातील लॉकडाऊन आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बर्‍याच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी पुढील रणनीतीबाबत चर्चा केली. यामध्ये अनेक राज्यांनी लॉकडाऊन वाढवण्याचा तर काही राज्यांनी टप्प्याटप्प्यात लॉकडाउन हटविण्याचा प्रस्ताव दिला आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्र्यांमधील ही बैठक सुमारे तीन तास चालली. 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *