
| मुंबई / कोलकाता | महाराष्ट्र, दिल्ली आणि तामिळनाडूनंतर आता पश्चिम बंगालमध्येही कोरोनाने वेगाने हात-पाय पसरायला सुरुवात केली आहे. येथे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर आता पश्चिम बंगाल सरकारने पुन्हा एकदा संपूर्ण राज्यात लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. आता पश्चिम बंगालमध्ये ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू राहील. मात्र, लॉकडाऊनमध्ये पूवीर्पेक्षा अधिक सूट देण्यात येईल, असेही ममता बॅनर्जी सरकारने म्हटले आहे.
लॉकडाऊनचा निर्णय घेण्यापूर्वी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. या बैठकीत नवे कोरोनाबाधीत आणि राज्याची स्थिती, यासंदर्भात चर्चा झाली. यानंतर राज्यात पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. सांगण्यात येते, की काही सूट आणि काही अटींच्या आधारे ३१ जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू राहील.
- ह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशनला (H.S.M.O) सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर..!
- भाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..!
- सर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार
- वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर न झाल्यास जि.प. समोर धरणे आंदोलन; जुनी पेन्शन संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..
- नेते अविनाश दौंड यांना महाराष्ट्र शासनाचा गुणवंत कामगार पुरस्कार जाहीर..!