| मुंबई | विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने आपले चार उमेदवार जाहीर केले आहेत. भाजपने शर्यतीत असलेल्या उत्सुक नेत्यांना धक्का देत, निष्ठावंतांना पुन्हा एकदा डावलल्याचं चित्र आहे. विधानपरिषदेसाठी भाजपने माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील, धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर, नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपाचे उमेदवार जाहीर.
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) May 8, 2020
सर्व उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि शुभेच्छा ! @BJP4India declares candidates for Maharashtra Vidhan Parishad elections.
Congratulations to all the candidates and best wishes ! #mlcelection pic.twitter.com/sRU6er1FKC
त्यामुळे भाजपने पंकजा मुंडे, एकनाथ खडसे, चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, प्रकाश मेहता यासारख्या तगड्या नेत्यांच्या नावावर फुली मारल्याचं चित्र आहे. दरम्यान भाजपमधील आयाराम रणजितसिंह मोहिते पाटील यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत निवडणुकीपूर्वी भाजप मध्ये प्रवेश केला होता. तर दुसरे गोपीचंद पडळकर यांनी विधानसभा निवडणूक भाजपच्या तिकिटावर लढली होती. बारामतीत त्यांचा अजित पवारांकडून मोठ्या फरकाने पराभव देखील झाला होता. या दोघांना भाजपने विधानपरिषदेला संधी देण्याचं ठरवलं आहे. याशिवाय भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते नागपूरचे माजी महापौर प्रवीण दटके आणि भाजपच्या मेडिकल सेलचे अध्यक्ष असलेले नांदेडचे डॉ. अजित गोपछेडे यांना देखील उमेदवारी दिली आहे.
दोन आयाराम आणि दोन निष्ठावान अशी झलक या नावांमधून सहज महाराष्ट्रासमोर आली आहे. दरम्यान निवडीची नावे पाहता टीम देवेंद्र अजुन बळकट झाल्याचे चित्र एकीकडे तर दुसरीकडे निष्ठवंताना पुन्हा डच्चू मिळाल्याने माजी मंत्री एकनाथ खडसे, पंकजा मुंडे, विनोद तावडे आणि चंद्रशेखर बावनकुळे या बड्या नेत्यांचं राजकीय पुनर्वसन पुन्हा लांबल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. यातून पक्षातील गटबाजीला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
ज्यांनी पक्षाला शिव्या दिल्या ते भाजपचे नेते झाले ज्यांनी पक्षा करता घाम गाळला त्यांना वनवास
Pankja tai na sandhi dyayla pahije hoti ajun hi vel geli nahi phandavis sahebana vinti ahe tai cha vichar kara