महाराष्ट्र दिन विशेष – हे आहेत महाराष्ट्रभूषण पुरस्काराचे मानकरी..!
निकष, समिती, स्वरूप आणि पुरस्कार प्राप्त मान्यवरांनी यादी..!महाराष्ट्र राज्यात कोणत्याही क्षेत्रात निरपेक्ष वृत्तीने सेवा करणाऱ्या तसेच त्याद्वारे मानवी जीवन उंचावण्यासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तीस महाराष्ट्र भूषण हा राज्याचा सर्वोच्च पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते.

पुरस्कारासाठी पात्रता व निकष :-

१. संबंधीत व्यक्तीने त्याच्या क्षेत्रात किमान २० वर्षे सातत्याने सेवाभावी वृत्तीने तसेच वैशिष्टयपूर्ण/उल्लेखनीय कार्य केलेले असावे. मात्र संशोधनाद्वारे कोणत्याही क्षेत्रात नवीन शोध लावला असल्यास तसेच क्रिडा क्षेत्रात अव्वल दर्जाचे अनेक पुरस्कार प्राप्त खेळाडूच्या बाबतीत विचार करुन हा नियम शिथिल करण्यात येईल.
२. सदर व्यक्तीचे महाराष्ट्रात किमान १५ वर्षे वास्तव्य असावे.
३. पदम पुरस्कार प्राप्त मान्यवरांना सदर पुरस्कारासाठी प्राधान्य देण्यात येईल.

पुरस्काराचे स्वरुप :-
१. या पुरस्काराची रक्कम रु. १० लाख इतकी असेल.
२. पुरस्कारार्थीला शाल आणि सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात येईल.

समितीचे अध्यक्ष व सदस्य :-
१. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य – अध्यक्ष
२. मंत्री, सांस्कृतिक कार्य – सदस्य
३. सचिव, सांस्कृतिक कार्य – सदस्य
४. संचालक, सांस्कृतिक कार्य – सदस्य सचिव
५. तसेच विविध क्षेत्रातील तज्ञ ,५ अशासकीय सदस्यांची नियुक्ती करण्यात येते.

आतापर्यंत महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालील मान्यवरांना प्रदान करण्यात आले आहेत-

मान्यवरांचे नाव वर्ष क्षेत्र
श्री. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे १९९७ साहित्य
श्रीमती लता मंगेशकर १९९८ संगीत
श्री. सुनील गावस्कर १९९९ क्रीडा
डॉ. विजय भाटकर २००० विज्ञान
श्री. सचिन तेंडुलकर २००१ क्रीडा
पं. भीमसेन जोशी २००२ संगीत
डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग २००३ समाजप्रबोधन
डॉ. मुरलीधर देविदास उर्फ बाबा आमटे २००४ समाजप्रबोधन
डॉ. रघुनाथ माशेलकर २००५ विज्ञान
श्री. रतन टाटा २००६ उद्योग
श्री. रामराव कृष्णराव उर्फ आर.के.पाटील २००७ समाजप्रबोधन
डॉ.नारायण विष्णू उर्फ नानासाहेब धर्माधिकारी २००८ समाजप्रबोधन
श्री. मंगेश पाडगावकर २००८ साहित्य
श्रीमती सुलोचना लाटकर २००९ मराठी चित्रपट
डॉ. जयंत नारळीकर २०१० विज्ञान
डॉ.अनिल काकोडकर २०११ विज्ञान
श्री. बाबासाहेब पुरंदरे २०१५

साहित्य


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *