महाविकास आघाडी म्हणजे सर्कस – केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह

| नवी दिल्ली | संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी महाराष्ट्रातील कोरोना संकटाच्या परिस्थितीवरुन महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रातील सरकार हे तीन पक्षांचं आहे. पण ते पाहून असं वाटतंय की सरकारच्या नावावर सर्कस सुरु आहे. विकासाचं जे व्हिजन हवं ते महाराष्ट्र सरकारकडे नाही, अशी टीका राजनाथ सिंह यांनी केली. तसंच महाराष्ट्र सरकारला जी काही मदत हवी असेल ती केंद्र सरकार पुरवेल, असंही त्यांनी सांगितलं.(mahavikasaaghadi is circus)

राजनाथ सिंह म्हणाले की, “महाराष्ट्रातील कोरोना परिस्थिती पाहता तिथे सरकार नावाची गोष्टच नाही, असं वाटतंय. सरकार आपल्या जबाबदारीपासून पळ काढू शकत नाही. महाराष्ट्रातील सरकार हे तीन पक्षांचं आहे. पण ते पाहून असं वाटतंय की सरकारच्या नावावर सर्कस सुरु आहे. नाही. विकासाचं जे व्हिजन हवं ते महाराष्ट्र सरकारकडे नाही.”

राजनाथ सिंह यांनी सोमवारी ( ८ जून) महाराष्ट्रातील भाजप कार्यकर्त्यांशी ‘व्हर्च्युअल रॅली”च्या माध्यमातून संवाद साधला. कोरोनासारख्या जागतिक महामारीचं संकट किती मोठं आहे हे किमान महाराष्ट्राला सांगण्याची गरज नाही. या संकटात महाराष्ट्राच्या जनताही धीटपणे सामोरं जात आहेत, असं राजनाथ सिंह यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.(mahavikasaaghadi is circus)

“कोरोनामुळे ज्या प्रकारची परिस्थिती महाराष्ट्रात उद्भवली आहे, तो गंभीर विषय आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या आव्हानाचा सामना करण्यासाठी शक्य तेवढी मदत मोदी सरकार करत आहे. कोरोना या महामारीचा फटका संपूर्ण जगाला बसला आहे. हे आव्हान भारताने दृढ निश्चयासह स्वीकारलं आहे. भारत सरकारच्या प्रयत्नांमुळेच कोरोना संकटात जगातील अनेक विकसित देशांच्या तुलनेत भारताची स्थिती फारच चांगली आहे,” असं राजनाथ सिंह म्हणाले.

शिवसेनेवर टीका करताना राजनाथ सिंह म्हणाले की, “निवडणुकीच्या वेळी शिवसेना आणि भाजपची युती झाली होती. पण सत्तेच्या हव्यासापोटी युती झाल्यानंतर भाजपला धोका देण्यात आला. मी भाजपची विचारधारा स्पष्ट करु इच्छितो, आम्हाला धोका मिळू शकतो पण धोका कधीच देऊ शकत नाही.”(mahavikasaaghadi is circus)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *