| मुंबई | कोरोना व्हायरसचा वाढत फैलाव लक्षात घेता, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही सेवा सुरू नाहीयेत.
अशा बिकट परिस्थितीत पोलिस आणि डॉक्टर हे दिवसातील कित्येत तास काम करत आहेत. काम करताना कोरोनाची लागण देखील होऊ शकते याची त्यांना चांगली कल्पना असली, तरी ते आपले काम खूपच चांगल्याप्रकारे करताना दिसत आहे.
दरम्यान, या परिस्थितीत त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी प्रत्येक नागरिक सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. अनेक कलाकार मंडळी गाण्यांमधून, डान्स मधून, संदेशामधून या कोविड योद्धांचे मनोबल वाढवत आहेत. त्यात आता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सुद्धा कोविड योद्धांसाठी खास रॅप सॉंग तयार केलं आहे. ‘We Can We Shall Overcome’ असे या गाण्याचे बोल आहेत.
या गाण्यामध्ये महेश मांजरेकर यांची कन्या अभिनेत्री सई मांजरेकर सह संपूर्ण कुटूंब या गाण्यात दिसत आहेत. हे युद्ध आम्ही जिंकणारच असे या गाण्याचा अर्थ आहे. यात सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, पृथ्वी शॉ या क्रिकेटपटूंसह सचिन खेडेकर , शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी आदी कलाकार देखील आहेत
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .