महेश मांजरेकर यांचे रॅप साँग हिट..!

| मुंबई | कोरोना व्हायरसचा वाढत फैलाव लक्षात घेता, देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लॉकडाऊन घोषित केला आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणत्याही सेवा सुरू नाहीयेत.

अशा बिकट परिस्थितीत पोलिस आणि डॉक्टर हे दिवसातील कित्येत तास काम करत आहेत. काम करताना कोरोनाची लागण देखील होऊ शकते याची त्यांना चांगली कल्पना असली, तरी ते आपले काम खूपच चांगल्याप्रकारे करताना दिसत आहे.

दरम्यान, या परिस्थितीत त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी प्रत्येक नागरिक सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. अनेक कलाकार मंडळी गाण्यांमधून, डान्स मधून, संदेशामधून या कोविड योद्धांचे मनोबल वाढवत आहेत.  त्यात आता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी सुद्धा कोविड योद्धांसाठी खास रॅप सॉंग तयार केलं आहे. ‘We Can We Shall Overcome’ असे या गाण्याचे बोल आहेत. 

या गाण्यामध्ये महेश मांजरेकर यांची कन्या अभिनेत्री सई मांजरेकर सह संपूर्ण कुटूंब या गाण्यात दिसत आहेत. हे युद्ध आम्ही जिंकणारच असे या गाण्याचा अर्थ आहे. यात सुनील गावसकर, दिलीप वेंगसरकर, संदीप पाटील, पृथ्वी शॉ या क्रिकेटपटूंसह सचिन खेडेकर , शिवाजी साटम, सिद्धार्थ जाधव, सोनाली कुलकर्णी आदी कलाकार देखील आहेत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *