राज्यात मराठी विषय सक्तीचा ; निर्णयाची अंमलबावणी यंदापासून..!

| मुंबई | इथून पुढे राज्यात सर्व बोर्डाच्या सर्व शाळांना मराठी विषय सक्तिचा करण्याच्या निर्णयाची या वर्षापासूनच अंमलबजावणी करावी लागणार आहे. राज्य सरकारने मराठी विषय सक्तिचा करण्याचा निर्णय याआधीच जाहीर केला होता. आता यावर्षीपासूनच अंमलबजावणी करण्याची घोषणा सरकारने केली आहे.

शालेय शिक्षण विभागाने याबाबत शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही माहिती दिली आहे.  यावर्षीपासून पहिली आणि सहावीच्या वर्गात मराठी विषय शिकवला जाईल. म्हणजे ज्या शाळांमध्ये मराठी शिकवलं जात नाही, त्या शाळांमध्ये पहिली आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना मराठी विषय शिकवला जाईल. 

सीबीएसई, आयसीएसई आणि आयबी, तसेच केंब्रिज आणि अन्य मंडळाचे व्यवस्थापन, मंडळांचे अभ्यासक्रम असलेल्या खाजगी व केंद्रीय शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीसाठी मराठी भाषा सक्तिची करण्यात आली आहे, असे शासन निर्णयात म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *