आमदार निलेश लंके यांचा स्तुत्य उपक्रम..

पाठीवर पंप टाकून करत आहेत गावोगाव फवारणी..!


नगर : बहुतेक आमदार घरात बसून आपल्या मतदारसंघाचा आढावा घेत असताना पारनेरचे आमदार निलेश लंके मात्र घरात बसून नव्हे, तर गावागावात जावून लोकांचे प्रश्न सोडवित आहेत. गेल्या दोन दिवसांपासून ते स्वतः जंतुनाशकांचा पंप पाठीवर टाकून गावात फवारणी करीत आहेत. त्यामुळे इतर कार्यकर्तेही जोरदार कामाला लागले आहेत.

कोरोनामुळे संपूर्ण देश संकटात आहे. अनेक राजकीय नेते लोकांसाठी काही ना काही मदत करीत आहेत. काहीजण घरात थांबून लोकांना आवाहन करीत आहेत. मात्र, आमदार लंके यांनी गावागावात जावून प्रबोधन केले. गरजुंना धान्य वाटप केले. आवश्यक तेथे मदत केली. मतदारसंघातील प्रत्येक गावात जंतुनाशकांची फवारणी व्हावी, यासाठी त्यांचे आटोकाट प्रयत्न आहेत.

त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी दोन दिवसांपासून गावागावात जावून स्वतः फवारणी सुरू केली आहे. त्यामुळे इतर कार्यकर्तेही जोरदार कामाला लागले आहेत. प्रत्येक गावातील पदाधिकाऱ्यांनी पुढाकार घेवून गावात फवारणी करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. अक्कलवाडी, चास, कामरगाव येथे गावातील प्रत्येक रस्त्यावर त्यांनी स्वतः फवारणी केली. आगामी काळातही विविध गावात जावून ते फवारणी करणार आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांनाही उत्साह येत असून, फवारणीसाठी ते सरसावले आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published.