इंदोरीकर महाराजांच्या भेटीला मनसे नेते, राहत्या घरी घेतली भेट..!

| अहमदनगर | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते अभिजीत पानसे यांनी शनिवारी समाजप्रबोधनकार इंदोरीकर महाराज यांची भेट घेतली. पानसे हे महाराजांच्या संगमनेर तालुक्यातील ओझर बुद्रूक येथील घरी आले होते.

सुमारे अर्धा तास पानसे यांनी इंदोरीकरांशी चर्चा केली. इंदोरीकर महराजांच्या भेटीनंतर पत्रकारांनी बोलताना पानसे म्हणाले, एखाद्या छोट्या चुकीची दिलगिरी महाराजांनी व्यक्त केली आहे. त्यांच्या कीर्तनातून समाजप्रबोधनाचे चांगले कार्य घडत आहे. त्यांनी स्वत:ची शाळा काढली आहे. त्यांचे हे मोठे कार्य आपण विसरणार आहोत का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.

यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ठाणे, पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव, वाहतूक नवनिर्माण सेनेचे प्रदेश उपाध्यक्ष अनिकेत झोळेकर, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, सचिव डॉ. संजय नवथर, सरचिटणीस तुषार बोंबले आदी यावेळी उपस्थित होते.

काय आहे नेमके प्रकरण:
सम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगा आणि विषम तिथीला स्त्री संग केल्यास मुलगी होते, असं वक्तव्य इंदोरीकर महाराजांनी एका कीर्तनात केले होते. त्यावरून राज्यभर गदारोळ उठला होता. अंधश्रद्धा निर्मूलन समितीसह अन्य पुरोगामी संघटनांनी महाराजांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. इंदोरीकर महाराजांनी या प्रकरणी खुलासाही केला होता. मात्र, त्यानंतरही त्यांच्यावर कायदेशीर कारवाईच्या मागणीवर पुरोगामी संघटना ठाम होत्या. अखेर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आता त्यांना कोर्टाच्या वा-याही कराव्या लागणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *