नाना पाटेकर सुशांतच्या पाटण्यातील घरी, वडिलांचे केले सांत्वन..!

| मुंबई | सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूने सिनेसृष्टीसह सर्वांना धक्का बसला आहे. सुशांतला आज १४ दिवस झाले. सुशांतच्या मृत्यूनंतर बॉलिवूड कलाकार ते राजकीय नेतेमंडळी त्याच्या पाटणाच्या घरी जाऊन त्याच्या कुटुंबियांचं सांत्वन करत आहेत. आज रविवारी बॉलिवूडचे ज्येष्ठ कलाकार नाना पाटेकर हे देखील पाटणा येथील सुशांत सिंहच्या घरी पोहोचले. यावेळी त्यांनी सुशांतच्या वडिलांची भेट घेतली. यादरम्यान, नाना पाटेकर अत्यंत भावूक झाले होते.

नाना पाटेकर हे आज सीआरपीएफ ट्रेनिंग सेंटरला लष्कराच्या जवानांचा उत्साह वाढवण्यासाठी पोहोचले होते. यादरम्यान, त्यांनी वेळ काढून सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांची भेट घेतली.

यापूर्वी तेजस्वी यादव, सुशील कुमार मोदी, रवी शंकर प्रसाद आणि मनोज तिवारी या नेत्यांनी सुशांतच्या घरी भेट दिली. त्याशिवाय, भोजपुरी सिनेसृष्टीतील कलाकार पवन सिंग, खेसारी लाल यादव, राकेश मिश्रा आणि अक्षरा सिंग यांनी सुशांतच्या कुटुंबियांची भेट घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published.