नरेंद्र मोदी व्हाईट हाऊसच्या नावडीचे झाले..!
ट्विटर वरून केले अनफॉलो..!



मुंबई :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अमेरिका राष्ट्राध्यक्षांचे कार्यालय व्हाइट हाऊसने ट्विटरवर अनफॉलो केले आहे. कोरोनाच्या विरोधात लढाईत अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांची मदत दिल्यानंतर व्हाइट हाऊसने त्यांना फॉलो करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर त्यावर वेगवेगळ्या माध्यमातून मोदींची स्तुती देखील केली होती. पण आता अचानक व्हाइट हाऊसने पंतप्रधान मोदी, पंतप्रधान कार्यालय, राष्ट्रपती भवनासहित सहा ट्विटर हॅण्डलला अनफॉलो केले आहे.

व्हाइट हाऊसने अचानकपणे अनफॉलो का केले, याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. याआधी हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषधांचा पुरवठा केल्यानंतर राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केले होते. त्यानंतर व्हाइट हाऊसच्या ट्विटर हॅण्डलने पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रपती कार्यालयाला फॉलो करण्यास सुरुवात केली होती. सध्या व्हाइट हाऊस १३ जणांना ट्विटरवर फॉलो करत असून हे सर्वजण अमेरिकन सरकारमधील महत्त्वाच्या व्यक्ती आहेत.

याआधी व्हाइट हाऊसच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून पंतप्रधान मोदींनी फॉलो करण्यात येत होते. पंतप्रधान मोदी हे जगातील एकमेव नेते होते. मात्र, अचानकपणे ट्विटरवर व्हाइट हाऊसने पंतप्रधान मोदींसह सहा भारतीय ट्विटर हॅण्डलला अनफॉलो केल्यामुळे चर्चा सुरू झाली आहे. तसेच सोशल मीडियातून #WhiteHouseBlocksModi हा ट्रेंड सध्या पाहायला मिळत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *