
| नवी दिल्ली | नवी दिल्लीतील कॅनॉट प्लेस येथील प्रसिद्ध द पार्क हॉटेलात नुकताच राजीव गांधी ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड हा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमासाठी देश-विदेशातील विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी उत्तम कामगिरी करणाऱ्या २५ जणांना राजीव गांधी ग्लोबल एक्सलन्स पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
राजीव गांधी ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड फाउंडेशन गेल्या २४ वर्षांपासून सातत्याने सामाजिक सेवा करत आहे. हे फाउंडेशन देत असलेल्या या पुरस्कारासाठी देश आणि जगातील सर्वोत्कृष्ट व्यक्तींची निवड केली जाते. ज्यांचे कार्य विविध क्षेत्रात सर्वोत्कृष्ट, प्रशंसनीय असे असते, त्यांनाच हा पुरस्कार दिला जातो.
तर यावेळी हा पुरस्कार महाराष्ट्रातील नवी मुंबई येथील उद्योजक श्री अस्लम शेख यांना देवून गौरविण्यात आले. २४ व्या राजीव गांधी ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड २०२२ ने त्यांना सन्मानित करण्यात आले. श्री शेख यांनी स्विमिंग पूल या नावीन्यपूर्ण क्षेत्रात उद्योजक म्हणून आपला ठसा उमटवला आहे. त्यांचे या क्षेत्रातील विशेष म्हणजे ते सिमेंटशिवाय नवा स्विमींग पूल बनवितात. त्यामुळे पंचतारांकित हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समध्ये तसेच घरांमध्येही मोठा तसेच पोर्टेबल वॉटरपूल आणि स्विमिंग पूल तयार करता येऊ लागला आहे, जे एक अद्वितीय कार्य आहे. या नव्या कार्यशैलीचा विचार करून राजीव गांधी ग्लोबल एक्सलन्स अवॉर्ड फाऊंडेशनच्या ज्यूरी बोर्डातील सदस्यांनी त्यांची या पुरस्कारासाठी निवड केली.
” हा पुरस्कार माझ्यासाठी मोठा सन्मान आहे. स्विमींग पूलच्या क्षेत्रात सातत्याने नवीन प्रयोग करण्याची संधी मी शोधत असतो. या पुरस्काराने त्या शोधक वृत्तीला अजून बळ दिले आहे.
– श्री. अस्लम शेख, पुरस्कार विजेते
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम .