कल्याण डोंबिवलीत नवीन कोविड रुग्णालय; उद्यापासून होणार सुरू..!

| कल्याण | कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत कोरोना रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. यामुळे अनेक रुग्णांना बेडची सुविधा मिळत नसल्याचे समोर येत होतं. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेने डोंबिवली क्रीडा संकुलातील बंदिस्त सभागृहात १८५ बेडची सुविधा असलेले कोविड रुग्णालय उभारले आहे.

उद्या ७ जुलै पासून रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध केले जाणार आहे. या कोविड रुग्णालयाची पाहणी आज खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, महापलिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी, महापौर विनिता राणे, शिवसेना नगरसेवक दिपेश म्हात्रे यांनी केली. या कोविड रुग्णालयामुळे भविष्यात कोरोना रुग्णांना बेडसाठी धावपळ करावी लागणार नाही, अशी प्रतिक्रिया श्रीकांत शिंदे यांनी दिली.

बंदीस्त क्रीडा संकुलातील डेडीकेटेट कोविड रुग्णालयात १५५ ऑक्सिजनयुक्त आणि ३० आसयीयूयुक्त बेड उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. ऑक्सिजनची सुविधा असलेले हे कोविड रुग्णालय सध्या तात्पुरत्या स्वरुपात बनवण्यात आले आहे. मात्र एखाद्या सुसज्ज रुग्णालयाच्या तोडीस तोड देणाऱ्या अद्यावत सुविधा त्यात आहे.

क्रीडा संकुलातील कोविड रुग्णालयाप्रमाणे डोंबिवली जिमखाना, कल्याण येथील फडके मैदानाजवळील आर्ट गॅलरी याठिकाणीही बेडची सोय ऑक्सीजन आणि आयसीयूयुक्त असेल. या ठिकाणी जवळपास १ हजार बेडची उपलब्धता येत्या दहा दिवसात करण्यात येईल. त्याचबरोबर पाटीदार भवन येथेही कोविड रुग्णांसाठी बेड उपलब्ध करुन दिले जाणार आहेत. वन रुपी क्लिनिक्सचे राहूल घुले यांनी हे रुग्णालय उभे करण्यात मोलाचे सहकार्य केले आहे. याठिकाणी पुरेसे डॉक्टर्स आणि नर्स उपलब्ध आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *