रुग्ण संख्या व्यवस्थापन नको, रुग्ण व्यवस्थापन गरजेचे – देवेंद्र फडणवीस

| पनवेल | माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे आज पनवेल दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी पनवेलमधील कोरोना रुग्णालयाला भेट दिली. दरम्यान त्यांनी रुग्णालयातील अधिकाऱ्यांशी चर्चा केली. यासोबतच तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. दरम्यान त्यांनी संख्येच्या व्यवस्थापनावर नाही तर रुग्ण व्यवस्थापनावर लक्ष द्या असे असे शासनाला म्हटले आहे.

देवेंद्र फडणवीस ट्विट करत म्हणाले की, ‘पनवेलमध्ये कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळण्याचे प्रमाण ४६ टक्के आहे. जून महिन्यात पनवेलमध्ये कोरोना रुग्ण मोठया प्रमाणात वाढले आहेत. तसेच जास्तीत जास्त चाचण्या हाच एकमेव मार्ग असल्याचेही ते म्हणाले. रुग्णांची ओळख पटवून त्यांना क्वारंटाइन करायला हवे. यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भावावर आळा घालता येऊ शकतो असेही फडणवीस यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *