आता कोरोना चाचणी निम्म्या किमतीत..!

| मुंबई | कोरोना व्हायरसच्या Coronavirus वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यानुसार खासगी लॅब्सना कोरोना चाचणीसाठी जास्तीत जास्त २२०० रुपयेच आकारता येतील. यापूर्वी कोरोनाच्या टेस्टसाठी साधारण ४४०० रुपये आकारले जात होते. खासगी लॅब्समध्ये यावर इतर कर लागून कोरोना टेस्टची किंमत बरीच जास्त होती.

मात्र, आता सरकारने या टेस्टसाठी २२०० रुपयांपेक्षा जास्त पैसे आकारू नयेत, असा आदेश काढला आहे. एखाद्या व्यक्तीच्या घरातून रक्ताचे आणि स्वॅबचे नमुने गोळा केले जात असतील तर त्यासाठी २८०० रुपये आकारण्याची मुभा देण्यात आली आहे. मात्र, राज्य सरकारने कोरोना टेस्टसाठी किंमत निश्चित करुन दिल्यामुळे आता खासगी लॅब्सकडून होणारी लूट थांबणार आहे. यामुळे सामान्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *