आता व्यंकय्या नायडू यांना राष्ट्रवादी युवक कॉंग्रेस पाठवणार २० लाख पत्रे..!

| मुंबई | उदयनराजे भोसले यांनी बुधवारी राज्यसभेत खासदारकीची शपथ घेतल्यानंतर ‘जय भवानी जय शिवाजी’ घोषणा दिली होती. मात्र सभापती व्यंकया नायडू यांनी यावर आक्षेप घेतला होता. याचाच निषेध म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस व्यंकया नायडूंना ‘जय भवानी जय शिवाजी’ घोषणेची २० लाख पत्रे पाठवणार आहेत.

दरम्यान शरद पवार यांनी राम मंदिराबाबत केलेल्या वक्तव्याचा निषेध करत भाजयुमोच्या वतीने त्यांच्या मुंबईतील घरच्या पत्त्यावर ‘जय श्रीराम’ लिहिलेली १० लाख पोस्टकार्ड राज्यभरातून पाठवणार आहेत. त्यालाच उत्तर म्हणून राष्ट्रवादीकडून व्यंकय्या नायडूंना २० लाख पत्रे पाठवली जाणार असल्याची माहिती राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष मेहबूब शेख यांनी सांगितलं.

काय म्हणाले मेहबूब शेख?

मेहबूब शेख म्हणाले की, “राज्यसभा खासदारांच्या शपथविधीच्या वेळी, भाजपच्याच एका खासदाराने ‘जय भवानी जय शिवाजी’ घोषणा दिली. परंतु राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी त्यावर आक्षेप घेतला. यावरुनच भाजपच्या मनात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल काय भावना दिसून आली. याचाच निषेध म्हणून राष्ट्रवादी युवक काँग्रेस ‘जय भवानी जय शिवाजी’ घोषणा लिहिलेले पोस्टकार्ड व्यंकय्या नायडू यांना पाठवणार आहे. भाजपने महाराष्ट्राचा द्वेष थांबवावा अन्यथा महाराष्ट्र त्यांना कधीच माफ करणार नाही.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *