आता नवीन अस्सल भारतीय व्हिडिओ कॉलिंग अॅप Say Namaste..!


  • दैनिक लोकशक्ती ऑनलाईन : गुरुवार, २३ एप्रिल

| मुंबई | जगभरात कोरोना व्हायरसनं धुमाकूळ घातला आहे. यामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन कऱण्यात आलं असून वर्क फ्रॉम होम करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामुळे मीटिंगसाठी व्हिडिओ कॉलिंगचं झूम हे अॅप मोठ्या प्रमाणात वापरल जात होते होतं. मात्र त्यामध्ये युजर्सचा डेटा लीक झाल्याचं समोर आल्यानंतर लोकांनी याला पर्याय शोधण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान भारतात Say Namaste हे अॅप तयार झालं आहे. याची चाचणीही घेण्यात येत असून बीटा व्हर्जन उपलब्ध आहे.

Say Namaste अॅपची निर्मिती कऱणाऱ्या कंपनीचे सीईएओ अनुज गर्ग यांनी सांगितलं की, अॅपचे प्री बीटा व्हर्जनबद्दल पर्सनल फेसबुक अकाउंटवरून माहिती दिली होती. आम्हाला किमान 100 युजर्सनी हे अॅप टेस्ट करावं अशी अपेक्षा होती पण काही वेळातच पाच लाख युजर्सनी हे अॅप वापरलं. अजुनही पूर्ण सेवा सुरू कऱण्यात आलेली नाही.

दरम्यान, Say Namaste अॅपची माहिती सोशल मीडियावरून फिरू लागली. भारत सरकारने हे अॅप सुरू केल्याचा दावाही करण्यात आला. त्याबद्दल सांगताना गर्ग म्हणाले की, हे अॅप पुर्णपणे खासगी आहे. त्यांची टीम आणि इतर 50 डेव्हलपर्स यावर काम करत आहेत. यासंदर्भात सरकारकडून कोणत्या सूचना किंवा माहिती देण्यात आलेली नाही. अनेकजण याबाबत बोलत आहेत हे सकारात्मक आहे. सरकारसोबत काम करायला आवडेल असंही गर्ग यांनी सांगितलं.

सध्या हे अॅप बीटा व्हर्जनमध्ये आहे. याला मोबाइल आणि लॅपटॉप दोन्ही प्लॅटफॉर्मवर वापरता येतं.जर तुम्ही अॅप ओपन केलंत तर त्यावर मेसेज येतो की, “We are facing tremendous demand for NAMASTE and hence you may face some temporary connectivity issues. Please check back soon” त्यामुळे आता लवकरच बीटा व्हर्जनची टेस्ट झाल्यानंतर अॅप सर्वांसाठी उपलब्ध होईल.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *