| मुंबई | अॅपलचा आयफोन जगभरात लोकप्रिय आहे, पण जेव्हा प्रतिस्पर्धी कंपनीचे अधिकारी iPhone वापरताना दिसतात तेव्हा काही ‘प्रश्न’ नक्कीच उपस्थित होतात. भारतात आणि विदेशात देखील प्रचंड खप असणाऱ्या स्मार्टफोन कंपनी Xiaomi चे सीईओ ली जुन (Lei Jun)यांच्याबाबत असंच काहीसं घडलंय. ली जुन यांनी काही दिवसांपूर्वीच चीनमधील आघाडीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर एक पोस्ट शेअर केली होती. पण या पोस्टमुळे त्यांचीच ‘पोलखोल’ झाली.
Weibo वर जर एखाद्या युजरने पोस्ट शेअर केली तर ती कोणत्या फोनवरुन केली आहे, याचीही माहिती मिळते. त्यामुळे ली जून यांनी केलेली पोस्ट iPhone वरुन करण्यात आल्याचं Weibo ने दाखवलं. लगेच सोशल मीडियावर याबाबत चर्चा सुरू झाली. त्यानंतर थोड्याचवेळात जुन यांनी ती पोस्ट डिलीट केली. पण आता या पोस्टचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
दरम्यान, Xiaomi Industry Investment Department चे पार्टनर पॅन जिउतांग यांनी जुन यांची बाजू घेतली आहे. स्ट्रॅटेजी आणि भविष्यातील योजना दर्जेदार बनवण्यासाठी प्रतिस्पर्धी कंपन्यांचे फोन वापरावे लागतात असे ते म्हणाले आहेत. तर, एकीकडे शाओमीचे स्मार्टफोन मोठमोठ्या कंपन्यांसाठी आव्हान ठरत असताना कंपनीच्या अधिकाऱ्यांनाच त्यांच्या ब्रँडवर विश्वास नाहीये का असा प्रश्न नेटकरी सोशल मीडियावर विचारत आहेत. तर काही नेटकरी हा विबोने दाखवलेला Error होता असंही म्हणत आहेत.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री - कार्यसम्राट दमदार आमदार महेंद्रशेठ थोरवे ६०००० च्या मताधिक्याने विधानसभेवर जाणार…पालकमंत्री उदयजी सामंत यांचे प्रतिपादन .
महाआघाडी सह मनसेलाही खिंडार…आमदार थोरवेंचा जलवा कायम . - सलमान खानच्या घरावर 40 गोळ्या झाडण्याचे आदेश होते, आरोपींचा धक्कादायक खुलासा