मालक Xiaomi चे आणि वापरतात iPhone, नेटकऱ्यांकडून ट्रोल!

| मुंबई | अ‍ॅपलचा आयफोन जगभरात लोकप्रिय आहे, पण जेव्हा प्रतिस्पर्धी कंपनीचे अधिकारी iPhone वापरताना दिसतात तेव्हा काही ‘प्रश्न’ नक्कीच उपस्थित होतात.  भारतात आणि विदेशात देखील प्रचंड खप असणाऱ्या स्मार्टफोन कंपनी Xiaomi चे सीईओ ली जुन (Lei Jun)यांच्याबाबत असंच काहीसं घडलंय. ली जुन यांनी काही दिवसांपूर्वीच चीनमधील आघाडीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वर एक पोस्ट शेअर केली होती. पण या पोस्टमुळे त्यांचीच ‘पोलखोल’ झाली. 

Weibo वर जर एखाद्या युजरने पोस्ट शेअर केली तर ती कोणत्या फोनवरुन केली आहे, याचीही माहिती मिळते. त्यामुळे ली जून यांनी केलेली पोस्ट iPhone वरुन करण्यात आल्याचं Weibo ने दाखवलं. लगेच सोशल मीडियावर याबाबत चर्चा सुरू झाली. त्यानंतर थोड्याचवेळात जुन यांनी ती पोस्ट डिलीट केली. पण आता या पोस्टचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

दरम्यान, Xiaomi Industry Investment Department चे पार्टनर पॅन जिउतांग यांनी जुन यांची बाजू घेतली आहे.  स्ट्रॅटेजी आणि भविष्यातील योजना दर्जेदार बनवण्यासाठी प्रतिस्पर्धी कंपन्यांचे फोन वापरावे लागतात असे ते म्हणाले आहेत. तर, एकीकडे शाओमीचे स्मार्टफोन मोठमोठ्या कंपन्यांसाठी आव्हान ठरत असताना कंपनीच्या अधिकाऱ्यांनाच त्यांच्या ब्रँडवर विश्वास नाहीये का असा प्रश्न नेटकरी सोशल मीडियावर विचारत आहेत.  तर काही नेटकरी हा विबोने दाखवलेला Error होता असंही म्हणत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *