पालघर प्रकरण – पीडितांची बाजू लढणाऱ्या वकिलाचा अपघाती मृत्यू..!

| पालघर | गडचिंचलेमध्ये झालेल्या साधू हत्याकांड प्रकरणी डहाणू न्यायालयात पीडितांची बाजू मांडण्यासाठी निघालेले वकील दिग्विजय त्रिवेदी यांचा मेंढवणच्या खिंडीत अपघाती मृत्यू झाला आहे.

 मिळालेल्या माहितीनुसार, मृत्यू झालेल्या साधूंच्या पक्षात विश्व हिंदु परिषदेच्या वतीने बाजू मांडण्यासाठी वकील दिग्विजय त्रिवेदी हे सकाळी १० च्या सुमारास जात असताना अपघात झाला. त्रिवेदी हे कारमधून येत असताना कार वरील ताबा सुटला व ती रस्त्याच्या कडेला उलटली. 

दरम्यान, गडचिंचले हत्या प्रकरणी आता आरोपींची संख्या १४१ झाली आहे. गुरुवारी सहा आरोपींना न्यायालयाने १९ मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आधीच अटकेत असलेल्या १०६ जणांपैकी पाच जणांना १६ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली. तर अन्य १०१ जणांना न्यायालयीन कोठडीत पाठवले आहे. तर त्यातील ४० जणांना तिसऱ्या गुन्ह्यात अटक केली असून त्यांना देखील १८ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *