पारनेर नगरसेवक प्रकरणात लोकप्रतिनिधींचे हसू झाले – माजी आमदार विजय औटी

| पारनेर / स्थानिक प्रतिनिधी | पारनेर नगरपंचायतचे नगरसेवक पक्षांतर प्रकरणात लोकप्रतिनिधींचे हसू झाले असून अशा पद्धतीने पक्षांतर करणे योग्य नसून नगरसेवकांच्या पाण्याविषयीच्या तक्रारीत काहीच तथ्य नसल्याचे माजी विधानसभा उपाध्यक्ष विजय औटी म्हणाले आहेत.

तसेच केवळ राजकारण करण्यासाठी काहीही कारणे देऊन पोरखेळ करत लोकप्रतिनिधींनी तालुक्याचे वाटोळे करू नये असा घणाघात माजी आमदार विजय औटी यांनी केला आहे. केवळ राजकारण करण्यासाठी पाण्याचा प्रश्न पुढे आला असून याबाबत आपण वरिष्ठांच्या संपर्कात असल्याचेही औटी यांनी सांगितले.

तसेच शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात चांगले काम करत असताना अशा गोष्टींनी विरोधकांना टीका करण्यास जागा मिळते; दुसरे काही होत नाही असे पुढे बोलताना औटी म्हणाले.

दरम्यान, पारनेर नगरपंचायत क्षेत्रातील पाच नगरसेवकांनी केलेले पक्षांतर राज्यभर गाजले होते. थेट मातोश्रीवर त्या सर्वांची घरवापसी करण्यात आली. थोडक्यात निलेश लंके यांनी आपल्या गळाला नगरसेवक तर लावलेच लावले, परंतु पुन्हा तो निर्णय बदलण्याची वेळ आली तर थेट मातोश्रीवर जावून तो निर्णय बदलवला..! एकंदरीत या राजकीय नाट्यात आमदार लंके यांनी बाजी मारली, हे नाकारून चालणार नाही अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.

1 Comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *