व्यक्तिवेध : महाराष्ट्राच्या राजकारणातील वजनदार नेतृत्व – देवेंद्र फडणवीस

स्वच्छ प्रतिमा, अभ्यासू वृत्ती, कुशल युवा राजकारणी आणि आर्थिक धोरणांसह विविध विषयांचा व्यासंग असलेले देवेंद्र फडणवीस आता महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते आहेत. नगरसेवक, सर्वात कमी वयात महापौर, आमदार, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष पद, मुख्यमंत्री आणि पुन्हा विरोधी पक्ष नेते असा यशस्वी टप्पा गाठणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांचा आज वाढदिवस त्या निमित्ताने..!

संपूर्ण नाव: देवेंद्र गंगाधरराव फडणवीस

शैक्षणिक पात्रता:

– व्यवसाय व्यवस्थापनात पदव्युत्तर पदवी
– डी.एस.ई बर्लिन या जर्मनीतील संस्थेमध्ये डिप्लोमा इन मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा
– एल.एल.बी (नागपूर विद्यापीठ)

राजकीय टप्पे:

– १९९९ ते आजतागायत – विधानसभा सदस्य, त्यात २०१४ ते २०१९ मुख्यमंत्री..!
– १९९२ ते २००१ सलग दोन वेळा नागपूर महापालिकेचे सदस्य, दोनवेळा नागपूरचे महापौर
– २०१३ साली अध्यक्ष, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
– २०१० सरचिटणीस, भाजपा महाराष्ट्र प्रदेश
– २००१ राष्ट्रीय उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा
– १९९४ प्रदेश उपाध्यक्ष, भारतीय जनता युवा मोर्चा
– १९९२ अध्यक्ष, नागपूर शहर भारतीय जनता युवा मोर्चा
– १९९० पदाधिकारी, नागपूर शहर पश्चिम
– १९८९ वॉर्ड अध्यक्ष, भाजयुमो

विधिमंडळातील कार्य:

१९९९ ते आजर्पंत विधिमंडळ सदस्यपदी निवडून आले, अंदाज समिती, नियम समिती, सार्वजनिक उपक्रम समिती, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण
नगरविकास व गृहनिर्माणाविषयी स्थायी समिती, राखीव निधीविषयी संयुक्त निवड समिती, स्वयंनिधीवर आधारित शाळांबद्दलची संयुक्त निवड समिती

अन्य माहिती:

– १९९० मध्ये राजकारणात प्रवेश
– १९९२ व १९९७ मध्ये नागपूर महापालिकेत सलग दोनदा निवडून आले.
– आजवरचे जगातील दुसरे तरुण महापौर (नागपूर)
– महापौर पदी पुन्हा निवडून येऊन महाराष्ट्रातून ‘मेयर इन काऊन्सिल’ चा मान मिळविणारे ते पहिलेच.

गुणविशेष:

– आर्थिक धोरणांसह विविध विषयांचा व्यासंग व विश्लेषण.
– इंधन / ऊर्जा सुरक्षितता व वातावरणातील बदल विषयांवर आंतरराष्ट्रीय परिसंवादामध्ये निमंत्रण

सामाजिक योगदान:

– सचिव, ग्लोबल पार्लमेंटेरिअन्स फोरम ऑन हॅबिटाट फॉर एशिया रिजन
– नागरी पायाभूत सुविधांसाठीचा वित्तपुरवठा आणि राजकीय व्यवस्थापनाच्या मुद्द्यांबाबत रिसोर्स पर्सन संयुक्त राष्ट्रांची मान्यता मिळालेल्या रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, मुंबई या संस्थेच्या कार्यकारी परिषदेचे सदस्य
– नाशिक येथील सेंट्रल हिंदू मिलिटरी एज्युकेशन सोसायटी (भोसला मिलिटरी स्कूल) चे उपाध्यक्ष
– नागपूर जिल्हा बास्केटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष
– राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य

आंतरराष्ट्रीय ठसा:

– होनोलुलू, अमेरिका येथे इंटरनॅशनल एनव्हायरमेंट समिटमध्ये सहभाग आणि सादरीकरण
– अमेरिकेतील वॉशिंग्टन व नॅशविले येथे यू. एस. नॅशनल कॉन्फरन्स ऑफ स्टेट लेजिस्लेचर्स
– स्वित्झर्लंडमध्ये दावोस येथे आयडीआरसी ‘युनेस्को’
– डब्ल्यूसीडीआर यांनी आयोजित केलेल्या ‘डिझास्टर मिटिगेशन अँड मॅनेजमेंट इन इंडिया’ या विषयावरील आंतराष्ट्रीय शिखर परिषदेत सादरीकरण
– चीनमध्ये बीजिंग येथे डब्ल्यूएमओ, ईएसएसपी यांनी आयोजित केलेल्या ग्लोबल एनव्हायरमेंटल चेंज कॉंग्रेसमध्ये ‘नॅचरल डिझास्टर्स मिटिगेशन इश्युज ऑन इकॉलिजिकल अँड सोशल रिस्क’ या विषयी सादरीकरण
– डेन्मार्कमध्ये कोपेनहेगेन येथे आशिया व युरोपमधील तरूण राजकीय नेत्यांच्या आसेम परिषदेत भारताचे प्रतिनिधीत्व,
– अमेरिकेच्या संघराज्य शासनाच्या ईस्ट-वेस्ट सेंटरतर्फे आयोजित न्यू जनरेशन सेमिनारमध्ये ‘एनर्जी सिक्युरिटी इश्युज’ या विषयावर शोधनिबंध सादरीकरण
– ऑस्ट्रेलिया, न्यूझिलॅंड आणि सिंगापूरला गेलेल्या कॉमनवेल्थ पार्लमेंटरी असोशिएशनच्या उच्चस्तरीय प्रतिनिधीमंडळाचे सदस्य
– रशियात मॉस्को येथे भेट देणाऱ्या इंडो रशिया चेंबर ऑफ कॉमर्सच्या शिष्टमंडळाचे सदस्य
– युरोपमध्ये क्रोएशिया येथे ‘ग्लोबल पार्लमेंटरियन फोरम ऑन हॅबिटाट’मध्ये सहभाग
– मलेशियामध्ये ‘जीपीएच एशिया रिजनल मीट’मध्ये सहभाग
– केनियातील नैरोबी येथे युनायटेड नेशन्स हॅबिटाटने निमंत्रित केलेल्या शिष्टमंडळाचे सदस्य

पुरस्कार :

– कॉमनवेल्थ पार्लमेंटेरियन असोसिएशनतर्फे वर्षसाठीचा सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
– राष्ट्रीय आंतर विद्यापीठ वादविवाद स्पर्धेत सर्वोत्कृष्ट वक्ता पुरस्कार
रोटरीचा मोस्ट चॅलेंजिंग यूथ विभागीय पुरस्कार
– मुक्तछंद, पुणे या संस्थेतर्फे स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ सर्वोत्कृष्ट संसदपटू पुरस्कार
– नाशिक येथील पूर्णवाद परिवारतर्फे राजयोगी नेता पुरस्कार

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *