
| नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान रात्री आठ वाजता देशाला संबोधित करणार आहेत. पंतप्रधान कार्यालयाने ट्विटरवर ही माहिती दिली आहे. कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेला लॉकडाऊन, जागतिक परिचारिका दिवस तसंच इतर विषयांवर पंतप्रधान मोदी भाष्य करतील, अशी शक्यता आहे.
Shri @narendramodi will be addressing the nation at 8 PM this evening.
— PMO India (@PMOIndia) May 12, 2020
देशात सोमवारी सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. लॉकडाउनच्या तिसऱ्या टप्प्याच्या अखेरीस एकाच दिवशी इतक्या मोठ्या संख्येनं रुग्ण आढळून आले आहेत. २४ तासांमध्ये ४,२१३ रुग्ण देशात आढळले. लॉकडाउन असतानाही रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना दिलासादायक बाब म्हणजे देशात अजूनही समूह संसर्ग झालेला नाही. मात्र, महाराष्ट्रासह काही राज्यातील स्थिती चिंता व्यक्त करण्यासारखी आहे. त्यामुळे १७ मे नंतर लॉकडाउनचं काय होणार? हे काही दिवसातचं स्पष्ट होण्याची चिन्ह आहेत. त्यासंदर्भात केंद्रानं राज्यांना धोरण आखण्याची सूचनाही केली आहे.
लॉकडाऊन वाढवण्याचे संकेत
पंतप्रधानांनी काल मुख्यमंत्र्यांसोबत संवाद साधला त्यावेळी लॉकडाऊन ४ कसा असेल याचे संकेत दिले. या बैठकीत पंतप्रधान म्हणाले की, “लॉकडाऊनच्या दुसऱ्या टप्प्यात पहिल्या टप्प्यातील आवश्यक उपायांची गरज नव्हती. अशाचप्रकारे तिसऱ्या टप्प्यातील आवश्यक उपाययोजनांची गरज चौथ्यामध्ये नाही, असं माझं मत आहे.” त्यांच्या या वक्तव्यावरुन लॉकडाऊन ४ चे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
लॉकडाऊनचे तीन टप्पे
पहिला लॉकडाऊन : २५ मार्च ते १४ एप्रिल
दुसरा लॉकडाऊन : १५ एप्रिल ते ३ मे
तिसरा लॉकडाऊन : ४ मे ते १७ मे
- “आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.!
- ह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशनला (H.S.M.O) सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर..!
- भाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..!
- सर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार
- वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर न झाल्यास जि.प. समोर धरणे आंदोलन; जुनी पेन्शन संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..