पोलीस सेवा संघटनेची पनवेल कार्यकारिणी जाहीर, रसायनी शहर अध्यक्षपदी वैभव देशमुख

| पनवेल | शिवराज्य कामगार हक्क संघटनेच्या संलग्नित पोलीस सेवा संघटनेने शहरातील अनेक नामवंत सामाजिक कार्यकर्त्यांची दखल घेत त्यांना संघटनेत सामावून घेतले आहे. वैभव बळीराम देशमुख यांची पोलीस सेवा संघटनेच्या रसायनी शहर अध्यक्षपदी निवड करण्यात आली असून संघटनेच्या कार्यकारिणीतील इतर सदस्यांची देखील निवड करण्यात आली आहे. अनेक सामाजिक उपक्रमात भाग घेऊन पोलिसांना केलेल्या सहकार्याची दखल वरिष्ठ पातळीवर घेण्यात आली.

सागर उकरडे यांची पनवेल शहर अध्यक्षपदी तर अरविंद सावंत शहर उपाध्यक्ष म्हणून काम पाहतील. इतर सदस्यांमध्ये सचिन गरजे, कल्पेश देव्हारे, विनोद शिर्के, महेश नाकाडे, पराग जाधव, सुनील मदने, भाग्यश्री ईनेकर व सिद्धेश मर्गज यांचा समावेश आहे. पुणे येथील शिवराज्य कामगार हक्क संघटनेच्या संलग्नित पोलीस सेवा संघटनेच्या त्रैमासिक बैठकीत रसायनी शहर अध्यक्षपदी देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती संस्थापक अध्यक्ष प्रकाश डोंगळे यांनी केली आहे. यासंदर्भातील नियुक्तीपत्र देशमुख यांना नुकतेच प्रदान करण्यात आले. कार्यकारिणीच्या नियुक्तीने पनवेल शहरात सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *