
| नवी दिल्ली /राजकीय प्रतिनिधी | तीन महिन्यांपूर्वी मध्य प्रदेशातील सत्तेवरून पायउतार व्हावं लागलेल्या काँग्रेससाठी राजस्थान नवी डोकेदुखी ठरण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. राजस्थानमधील सत्तेत राजकीय भूकंप येण्याचे संकेत निर्माण झाले आहेत. दरम्यान काँग्रेसचं सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून घोडेबाजाराचा प्रयत्न सुरू असल्याचा धक्कादायक आरोप राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मागे केला होता. त्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या असून, उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे २२ आमदारांसह दिल्लीत दाखल झाले आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशमधील राजकीय भूकंपाची राजस्थानातही पुनरावृत्ती होते की काय अशी चर्चा सध्या सुरू झाली आहे.
मध्य प्रदेशात काँग्रेसमध्ये दुफळी निर्माण झाल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्याचबरोबर काँग्रेसचे काही आमदारही भाजपात दाखल झाल्यानं तत्कालीन मुख्यमंत्री कमलनाथ यांचं सरकार अल्पमतात येऊन कोसळलं. त्यानंतर भाजपानं मध्य प्रदेशातील सत्तेची सूत्र हाती घेतली. या घटनेला तीन महिने लोटत नाही, तोच राजस्थानातही अस्थिरतेचे हादरे जाणवू लागले आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी सरकार पाडण्यासाठी भाजपाकडून प्रयत्न होत असल्याचा आरोप केला होता.
त्यानंतर काल (११ जुलै) राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट हे २२ आमदारांना घेऊन दिल्लीला गेले. या आमदारांना हरयाणातील गुरुग्रामध्ये एका रिसॉर्टवर ठेवण्यात आलं आहे. सुरवातीपासूनच मुख्यमंत्री अशोक गेहलोत व उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये वर्चस्वावरून धुसफूस सुरू आहे. दोन्ही नेत्यांमध्ये अविश्वास असल्याचं राजकीय वर्तुळात बोललं जात असून, त्यामुळे सचिन पायलट हे नाराज असल्याचं समजतं.
आता हे प्रकरण काँग्रेसचे राजस्थान मधील सरकार सोबत घेऊन कोसळते का.? की काँग्रेस हाय कमांड यावर काही तोडगा काढते हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल. दरम्यान ज्योतिरादित्य शिंदे यांचे मन वळविण्यासाठी सचिन पायलट यांनी प्रयत्न केले होते, परंतु आता त्यांची स्वतः चीच मानसिकता वेगळी झाली आहे का..? हे येणारा काळच सांगेल..!
- आधी संपलेला पक्ष अशी टीका, आता युतीसाठी विनवण्या – एकनाथ शिंदे
एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका - जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री