| मुंबई | महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच काही महत्वाची बदल होण्याची चिन्ह आहेत. नाना पटोले यांना विधानसभा अध्यक्षपदाऐवजी प्रदेशाध्यक्षपदी आणलं जाण्याच्या तर विधानसभा अध्यक्षपदी पृथ्वीराज चव्हाणांना आणण्याच्या हालचाली सुरु असल्याची सूत्रांची माहिती आहे. काँग्रेस वर्तुळात या बदलाची जोरदार चर्चा सुरु झाली आहे. दोन दिवसांपासून नाना पटोले हे दिल्लीवारी वर आहेत. त्यांच्या दिल्ली दौऱ्यामागेही हेच कारण असल्याचं कळतंय.
विधानसभा अध्यक्ष निवडीला अजून वर्षही पूर्ण झालेलं नाही. परंतु काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे सध्या मंत्रिमंडळात महसूल मंत्रीही आहेत. शिवाय काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदाची जबाबदारीही त्यांच्याकडेच आहे. त्यामुळे त्यांना प्रदेशाध्यक्षपदाच्या जबाबदारीतून त्यांना मुक्त केलं जाऊ शकतं.
दरम्यान नाना पटोले हे आक्रमक स्वभावाचे नेते आहेत त्यामुळे विदर्भात काँग्रेस भाजपला टक्कर देत आहे. तसेच ओबीसी समाजाचं प्रतिनिधित्व ते करतात. ते मूळचे काँग्रेसचे, पण २०१४ला ते भाजपच्या तिकीटावर खासदार झाले. पण भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देणारे देशातले पहिले खासदार ठरले होते.
नाना पटोलेंच्या ऐवजी पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपद दिलं जाऊ शकतं. मागच्या वेळीसुद्धा पृथ्वीराज चव्हाण यांना विधानसभा अध्यक्षपदाची ऑफर देण्यात आली होती. परंतु त्यांनी ती स्वीकारली नाही. त्यामुळे आता ते ही ऑफर स्वीकारतात का याची उत्सुकता आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वूभूमीवर हे बदल होतात की हे संकट संपल्यानंतर हे होते, हे पाहणे देखील उत्सुकतेचे ठरणार आहे.
- जळगावात तरुणीची अत्याचार करून हत्या
- तिहेरी हत्याकांडाने हादरला रायगड जिल्हा…एकाच कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या
7 महिन्याच्या गर्भवती महिलेच्या हत्येने हुतात्म्यांची भूमी सुन्न.. - महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटना ठाणे महापालिका जिल्हा कार्यकारिणी स्थापन
राज्य कोषाध्यक्ष श्री अरुण बडे आणि ठाणे जिल्ह्या अध्यक्ष अरुण कराळे यांच्या निरीक्षणात पार पडली सभा - मिरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील सी.सी टीव्हीसाठीचे मध्यवर्ती शाळा नियंत्रण कक्षाचे दूरदूरश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण संपन्न
*मिरा-भाईंदर महानगरपालिकेचे अनुकरण इतर महानगरपालिकांनीही करावे – मुख्यमंत्री