
| अहमदनगर | जिजाऊ ब्रिगेडच्या वतीने प्रकाशित केलेल्या ‘मराठा सेवा संघ शिवधर्म दिनदर्शिके’चे प्रकाशन जिजाऊ ब्रिगेडच्या दक्षिण जिल्हा अध्यक्षा संपुर्णाताई सावंत यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी संपुर्णाताई सावंत म्हणाले की, तरुणांनी गटातटाच्या राजकारणात अडकून न राहता महापुरुषांच्या विचारांचा आदर्श घेऊन आपली वाटचाल करावी शिवधर्म दिनदर्शिका विज्ञानवादी समतावादी स्वतंत्रतावादी विचारांची दिनदर्शिका असल्याचे मत यावेळी त्यांनी व्यक्त केले असून शिवधर्म दिनदर्शिकेमध्ये कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला थारा दिलेला नाही. सर्व महापुरुषांचे जन्मदिवस व स्मृतीदिवस याची नोंद करण्यात आलेली आहे. दिनदर्शिकेच्या मुखपृष्ठावर स्वामी विवेकानंद यांचे आकर्षक तेजस्वी छायाचित्र आहे. तसेच प्रत्येक पानावर स्वामी विवेकानंद यांचे विचार, शिकवण यांची माहिती दिली आहे.
या प्रकाशनावेळी जिजाऊ ब्रिगेडच्या शहर अध्यक्ष सुरेखाताई कडुस, सावेडी शाखा अध्यक्ष डाॅ.कल्पना ठुबे, अॅड अनुराधा येवले, शारदा पवार,वंदना निघुट,सुरेखाताई सांगळे, जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेश संघटक अनिता काळे, जयश्री कुटे, कोमल पवार, रेणूका दौंड, मीरा दारकुंडे कु.कोमल वाकळे, ईश्वरी पवार यांच्यासह मराठा सेवा संघ, संभाजी ब्रिगेड व इतर ३४ कक्षाचे पदाधिकारी आदी उपस्थित होते.
- “आंतरभारती – भारत जोडो ” श्रमसंस्कार छावणीत विविध उपक्रमांची रेलचेल, तरुणांचा उत्स्फूर्त सहभाग.!
- ह्युमन सर्वर मल्टीपर्पज ऑर्गायझेशनला (H.S.M.O) सामाजिक कार्याचा नवरत्न पुरस्कार जाहीर..!
- भाजपचे माजी मंत्री श्री परिणय फुके यांच्या प्रश्नावर शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांनी केले ‘ हे ‘ आवाहन..!
- सर्वसमावेशक पॅनल उभा करून सभासदांच्या हितांचे रक्षण करणार ; पेण प्राथमिक शिक्षक पतपेढी सत्ताधारी पॅनल चा निर्धार
- वरिष्ठ वेतनश्रेणी प्रस्ताव मंजूर न झाल्यास जि.प. समोर धरणे आंदोलन; जुनी पेन्शन संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात..